शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्यासाठी अनधिकृत होर्डिंगबाजी

By admin | Updated: September 26, 2016 02:27 IST

माथाडी मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र होर्डिंग लावण्यात आले होते. महापालिकेची परवानगी न घेताच

नवी मुंबई : माथाडी मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र होर्डिंग लावण्यात आले होते. महापालिकेची परवानगी न घेताच अनेक होर्र्डिंग लावून शहर विद्रूप केल्याचे चित्र दिसू लागल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून आयुक्त तुकाराम मुंढे याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कामगार मेळाव्यासाठी एपीएमसीच्या बाहेर माथाडी कामगार व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले होते. सानपाडा रेल्वे स्टेशन ते एपीएमसी मार्केट व अन्नपूर्णा चौक ते अरेंजा सर्कल दरम्यान विद्युत खांबावरही मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होर्डिंग लावले होते. यामधील काही अपवाद वगळते तर इतर होर्डिंगसाठी परवानगीच घेण्यात आली नव्हती. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नेरूळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र इथापे यांच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. इतरही काही नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल होणार का असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. (प्रतिनिधी)एपीएमसीमधील माथाडी मेळाव्यामध्ये राज्यभरात चांगले काम करणाऱ्या कामगारांना माथाडी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात यतो. यावर्षी राज्यातील पंधरा कामगारांना माथाडी भूषण पुरस्कार देण्यात आला. यामध्ये मारूती विठोबा कंक, अहमद हुसेन कचोरी, बाबूराव वीरप्पा वेळे, भिकाजी श्रीपती लोखंडे, पिराजी रामू नेवसे, शंकर काळे, महादेव सूर्यवंशी, भरत आढाव, ओमप्रकाश चौधरी, लक्ष्मण कोंडीबा कदम, पुणे जिल्ह्यातील विवेक सुरेश ओंबासे,स्वप्निल सुनील येवले, नाशिकमधील बाजीराव हरी सोनावणे, संतोष नामदेव म्हस्के, अहमदनगरमधील नवनाथ किसन सलालकर यांचा समावेश आहे. कामगारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.