शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत चाळीवर पाणीपुरवठा विभाग मेहरबान

By admin | Updated: September 14, 2016 04:48 IST

इंदिरानगरमधील अनधिकृतपणे बांधलेल्या चाळीमध्ये मोटारचा वापर केला जात आहे. अनधिकृतपणे साठवण टाकीही बसविली असून सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणारे

नवी मुंबई : इंदिरानगरमधील अनधिकृतपणे बांधलेल्या चाळीमध्ये मोटारचा वापर केला जात आहे. अनधिकृतपणे साठवण टाकीही बसविली असून सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणारे प्रशासन संबंधीतांवर काहीच कारवाई करत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अनधिकृत नळजोडण्या तोडण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर पालिका प्रशासनाने तीन हजारपेक्षा जास्त नळजोडण्या खंडीत केल्या आहेत. कोपरखैरणे, वाशी, ऐरोली, नेरूळ परिसरामध्ये नागरिकांनी बसविलेल्या मोटार जप्त केल्या आहेत. परंतु इंदिरानगरमध्ये मनपा शाळेच्या बाजूला अनधिकृतपणे चाळ उभारण्यात आली आहे. एक मजली इमारत उभी केली असून त्या खोल्या भाड्याने दिल्या आहेत. येथे वैयक्तीक नळजोडणी केली असून पाणी साठविण्यासाठी स्वतंत्र टाकी बसविण्यात आली आहे. इंदिरानगरमध्ये या चाळीमालकाचा भंगारचा व्यवसाय आहे. भंगारच्या गोदामावरही साठवण टाकी बसविण्यात आली आहे. मुळात गोडावूनचा एक मजलाही पालिकेची परवानगी न घेता वाढविण्यात आला आहे. येथेही मोटारचा वापर केला जात आहे. महापालिका प्रशासन या नळजोडण्यांवर का कारवाई करत नाही असा प्रश्न परिसरतील रहिवाशी विचारू लागले आहेत. (प्रतिनिधी)