शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरची १८० शौचालये दुरवस्थेच्या गर्तेत

By admin | Updated: May 11, 2016 02:03 IST

शहर स्वच्छ आणि सुंदर रहावे, यासाठी एमएमआरडीएने ३२ कोटी खर्च करून १८० दुमजली शौचालये बांधली. मात्र त्यांतील अनेकांचे काम निकृष्ट आहे.

उल्हासनगर : शहर स्वच्छ आणि सुंदर रहावे, यासाठी एमएमआरडीएने ३२ कोटी खर्च करून १८० दुमजली शौचालये बांधली. मात्र त्यांतील अनेकांचे काम निकृष्ट आहे. काही तर धोकादायक बनली आहेत. ३० शौचालये कुलुपबंद आहेत. पालिकेने त्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली असल्याने आता पालिकेनेच ती ताब्यात घ्यावी अशी मागणी सुरू झाली आहे. देखभाल होत नसल्याने शौचालयांची दुरवस्था झाली असून आता पालिकेनेच ती ताब्यात घ्यावी, अशी मागणी रिपाईचे शहराध्यक्ष व नगरसेवक भगवान भालेराव यांनी केली आहे. प्रभागातील शौचालय ताब्यात घेवून त्यांनी नागरिकांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली आहे. नगरसेवक म्हणून मिळणाऱ्या मानधनातून ते त्याची निगा राखणार आहेत. तसाच प्रयत्न अन्य नगरसेवकांनाही करता येईल, असा विचारही त्यांनी मांडला आहे. एमएमआरडीएचे तत्कालीन आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी उल्हासनगरला धावती भेट दिली होती. शहरातील अस्वच्छता पाहून त्यांनी शहरात शौचालयाची योजना राबविण्याची संकल्पना पालिकेसमोर मांडली. दुमजली शौचालयाची निगा राखणाऱ्या कामगाराला तेथेच वर एक खोलीही बांधून दिली आहे. शौचालयाला जागा पालिकेने दिली आहे. त्याजागी एमएमआरडीएने १८० शौचालये तीन टप्प्यात बांधून दिली आहेत. त्यावर ३२ कोटीचा खर्चही झाला आहे. एमएमआरडीएने बांधलेल्या शौचालयातील अनेकांची कामे निकृष्ट झाली असून काही शौचालये तर धोकादायक बनली आहेत. ३० शौचालये अद्यापही कुलूप बंद आहेत. त्यांचे उद्घाटनच झालेले नाही. शौचालयाचे काम निकृष्ट करणाऱ्या संस्थेला एमएमआरडीएने काळया यादीत टाकले असून ही कारवाई त्यापुढे जाऊ शकलेली नाही. शौचालयाच्या नावाखाली कोटयवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला असून निगा राखण्यासाठी ती स्थानिक समाजसेवा संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आली. महापालिकेने प्रत्येक शौचालयामागे निगा राखणाऱ्या संस्थेला वीज-पाणी बिलापोटी दरमहा दोन हजार रूपयेही दिले. स्थानिक नागरिकांकडून दरमहा दर आकारून शौचालयाची निगा राखण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले. मात्र त्यात ते कमी पडले. मात्र या सर्व व्यवस्थेत गैरप्रकार वाढीस लागल्याने ती पालिकेने ताब्यात घेवून स्वत: चालविण्याची मागणी अनेक वर्षे होत आहे. त्याची सुरवात रिपाईचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष भगवान भालेराव यांनी स्वत:च्या प्रभागापासून केली. प्रभागातील दोन शौचालये ताब्यात घेऊन त्यांची निगा त्यांनी बचत गटामार्फत सुरू केली. नगरसेवक मानधनातून दोन कामगारांची नियुक्ती केली आहे.प्रत्येक घरी शौचालयाची योजना प्रशासन राबवित असून त्यासाठी पालिकेने आतापर्यंत दोन कोटीचा निधी खर्च केला आहे. ज्यांच्याकडे शौचालयासाठी जागा नाही, त्यांच्यासाठी पालिका आणि एमएमआरडीएच्या शौचालयाचा आधाार आहे. (प्रतिनिधी)