शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उरणमधील युईएस शाळा व्यवस्थानाचा प्रताप; आठ वर्षीय मृत विद्यार्थीनीच्या पालकांना फी भरण्यासाठी नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2023 23:09 IST

पालक, नागरिकांमध्ये संतापाची लाट 

मधुकर ठाकूर, उरण : नोव्हेंबर महिन्यात अकस्मित निधन झाल्यानंतर शाळेच्या रजिस्टरमधुन नावही कमी करण्यात आले आहे.मात्र त्यानंतरही येथील युईएस शाळेने पालकांना त्वरित फी भरण्यासाठी नोटीस बजावली आहे.युईएस शाळा व्यवस्थापनाच्या या अघोरी संतापजनक प्रकारामुळे मात्र येथील पालक, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

उरण तालुक्यातील नामांकित उरण एज्युकेशन सोसायटीची युईएस इंग्रजी माध्यमाची १२ पर्यंत शाळा आहे.या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हनुमान कोळीवाडा येथील रहिवासी भक्तेश म्हात्रे यांच्या आठ वर्ष वयाच्या दोन जुळ्या मुली दुसरीत शिकत होत्या.  या दोन जुळ्या मुलींपैकी हर्षी हिचे १ नोव्हेंबर २०२२ रोजी दुदैवाने अकस्मित निधन झाले आहे.मुलीच्या निधनानंतर पालकांनी वर्ग शिक्षक,शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊन याबाबत माहिती दिली आहे.मृत्युपत्र सादर करुन हर्षीचे नावही शाळेच्या रजिस्टर मधुन नोव्हेंबर महिन्यातच कमी केले आहे. मात्र चिमुकल्या हर्षीच्या अकस्मित दुदैवी निधनाने पालक दुखातुन अद्यापही सावरलेले नसताही २४ फेब्रुवारी रोजी शाळा व्यवस्थापनाने मृत हर्षीची माहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत ६००० रुपये फी तत्काळ भरण्यासाठी नोटीस बजावली आहे.युईएस शाळा व्यवस्थापनाच्या या संतापजनक प्रकारामुळे मात्र येथील पालक, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शाळा व्यवस्थापनाचा हा प्रकार मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आणि संतापजनक आहे.कोरोना काळातही शाळेने शासनाच्या आदेशानंतरही शाळा बंद असतानाही पालकांकडून सक्तीने फी वसूल केली आहे.आता पुन्हा ३१ टक्के फी वाढीचा प्रस्ताव आणला आहे.विचारणा करणाऱ्यांना व्यवस्थापनाकडून फी परवडत नसेल तर पाल्यांना म्युनिसिपल शाळेत घाला अशी दुरुत्तरे दिली जात आहेत.अशी माहिती युईएस शाळेच्या पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा प्राजक्ता गांगण यांनी दिली.  

शाळा व्यवस्थापनाची चुक झाली आहे.फी वसुलीसाठी नोटीस काढणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या पालकांची भेट घेऊन माफीही मागितली असल्याची माहिती युईएस संस्थेचे अध्यक्ष  तनसुख जैन यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :uran-acउरण