शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दोन गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: August 1, 2014 03:32 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले, त्याचबरोबर तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला आहे.

पनवेल : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले, त्याचबरोबर तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क झाली असून आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. रविवारी आणि सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने मंगळवार आणि बुधवारी काही प्रमाणात उघडीप घेतली होती. मात्र बुधवारी रात्री अचानक पावसाचा जोर वाढला. गुरुवारी सकाळी तर मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, खारघर या ठिकाणी रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साचले होते. महामार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी आल्याने वाहतूक मंदावली होती. पावसाचा जोर वाढत गेल्याने चाकरमानी, विद्यार्थ्यांचे हाल झाले. आज ७० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्याने धोदाणी आणि मालडुंगे या दोन गावांचा संपर्क तुटल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. त्याचबरोबर या भागातील मोबाइल सेवाही खंडित झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गाढी आणि पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने आजूबाजूच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात आज प्रांताधिकारी सुदाम परदेशी यांनी तातडीची बैठक बोलावून आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार पवन चांडक, गटविकास अधिकारी राजेंद्र पाटील, नायब तहसीलदार अधिक पाटील, सुहास खामकर यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रांताधिकाऱ्यांनी चिखले, वारदोली, माखुर्ली त्याचबरोबर वाजापूर येथील पिंपळवाडी या पूरसदृश गावांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर मालडुंगी आणि धोदाणी या परिसरात वॉकीटॉकीच्या माध्यमातून संपर्क साधण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. तसेच या गावांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी यंत्रणा राबविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सुमंत भांगे हेही परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असून ते याबाबत अपडेट घेत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)