शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भे विभागातून दोन टन प्लास्टीक साठा जप्त; महानगरपालिकेच्या पथकाची कारवाई 

By नामदेव मोरे | Updated: December 23, 2022 17:08 IST

प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने व्यापक प्रमाणात जनजागृती सुरु केली आहे. व्यापारी व ग्राहकांनीही प्लास्टीकचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेने प्लास्टीक विरोधात मोहीम सुरु केली आहे. तुर्भे विभाग कार्यालयाने दोन टन ३० किलो प्लास्टीक जप्त केले असून ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे. दहा दिवसांपूर्वीही १२०० किलो प्लास्टीक साठा जप्त करण्यात आला होता.

प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने व्यापक प्रमाणात जनजागृती सुरु केली आहे. व्यापारी व ग्राहकांनीही प्लास्टीकचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. यानंतरही नियमांचे उल्लंघन करणारांविरोधात कारवाई सुरु केली आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे, तुर्भेचे विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टीक विरोधात मोहीम राबविली जात आहे. बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील विधी प्लास्टीक गोडाऊन, ग्रोम सेंटरमधील गाला ब्रदर्स,जयेश कुमार, सिंघवी प्लास्टिक या व्यवसायीकांवर यापुर्वी कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला होतचा. त्यांच्यावर दुसऱ्यांदा कारवाई करून प्रत्येकी १० हजार रुपये दंड वसूल केला आहे. त्यांच्याकडील सर्व प्लास्टीक साठाही जप्त केला आहे. मर्चंट सेंटर मधील न्यू मार्ट आणि ओम फरसाण मार्ट या दोन दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळल्यामुळे त्यांच्याकडूनही प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.२१ डिसेंबरलाही सेक्टर १९ मधील थर्माकोल गोडाऊनवर अचानक छापा टाकून २३९ बॉक्समधून ३५० किलो वजनाचे थर्माकॉल जप्त कण्यात आले असून त्यांच्याडून १० हजार रुपये दंड वसूल केला आहे.शहर प्लास्टीकमुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. नागरिकांनी प्लास्टीक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा. व्यापाऱ्यांनीही बंदी असलेल्या प्लास्टीकचा व्यापर करू नये असे आवाहन मनपा अधिकाऱ्यांनी केले आहे.

प्लास्टीक पिशव्या व वस्तुंची खरेदी, विक्री, साठवणूक, वाहतूक व वापर करण्यास बंदी आहे. प्लास्टीकमुक्त शहर करण्यासाठी महनगरपालिका आयुक्तांच्या मार्गर्शनाखाली व्यापक जनजागृती सुरु आहे. जनजागृतीनंतरही प्लास्टीकचा वापर करणारांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जात आहे.- सुखदेव येडवे, विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त तुर्भे 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबईPlastic banप्लॅस्टिक बंदी