शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

पनवेल परिसरात झाली तब्बल दोन हजार 41 वाहनांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 00:45 IST

गतवर्षीच्या तुलनेत चार चाकींची विक्री जास्त

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : यंदा कोरोनाचे संकट असले तरी वाहन उद्योगासाठी गेला पंधरवडा मध्यम ठरला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत २ हजार ४१ वाहने रस्त्यावर उतली आहेत. गतवर्षी प्रमाणे यंदा दुचाकींची विक्री मध्यम ठरली आहे. तर गतवर्षीपेक्षा यंदा ३०० चार चाकींची विक्री अधिक झाली आहे. त्याचबरोबर इतर मालवाहतूक वाहने, तीन चाकी वाहनांचा समावेश आहे.

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठेवर आर्थिक मंदीचे सावट पसरले आहे. जूनपासून अनलॉक झाल्यानंतर बाजारपेठेत हळूहळू आर्थिक उलाढाल होण्यास मदत होऊ लागली आहे. यंदा दिवाळीत खरेदी-विक्री झाल्याने बाजारपेठेने मोठी उसंडी मारली आहे. वाहन खरेदीत यंदा दुचाकींची मध्यम प्रमाणात विक्री झाली आहे. तर चार चाकी विकत घेण्यास ग्राहकांनी जास्त प्रमाणात पसंती दिली आहे. नवरात्रौत्सवात वाहन विक्री कमी प्रमाणात झाली होती. तर दिवाळीत वाहन खरेदीत तेजी आली आहे. दुचाकी, चार चाकी वाहनांबरोबरच मालवाहतूक वाहने, तीन चाकी वाहनांचीदेखील विक्री झाली आहे.

कोरोना काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यामुळे दुचाकी घेऊ शकलो नाही. लॉकडाऊन काळात परिस्थिती बिकट होती. जूननंतर कामावर जाण्यासाठी आगोदर बसने प्रवास करावा लागत होता. आता बसमध्ये कोरोनाची भीती वाटत आहे. माझ्याकडील आर्थिक बाबी सुरळीत झाल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी घेण्याचा योग आला.- किशोर सानप, दुचाकी ग्राहक

वर्षभर दुचाकीसाठी पैसे साठवले होते. चांगली बाइक घेण्याचे नियोजनही केले होते. परंतु कोरोनामुळे निराशा झाली होती. कोरोना काळात साठविलेले काही पैसे खर्चही झाले. जूनपासून कामावर जात आहे. आगोदरची दुचाकी खराब झाली आहे. आता नवीन घेण्यासाठी लोन पास झाल्याने दिवाळीत दुचाकी खरेदी केली आहे. त्यामुळे आता दिलासा मिळाला आहे. - आशिष पवार, दुचाकी ग्राहक

कोरोनाचे सावट असले तरी यंदा घर खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे. दिवाळीदरम्यान पनवेल परिसरात प्लॅट, प्लॉट, रो हाउस, शॉपची विक्री झाली आहे. यंदा बँकाचे व्याजदर कमी झाले आहेत. त्याचबरोबर मुद्रांक शुल्कात सवलतीमुळे बांधकाम व्यवसायाला उभारी मिळाली आहे.

कोरोनामुळे जास्त प्रमाणात एकटे वावरण्यासाठी चार चाकींच्या मागणीत वाढ झाली आहे. दसरानिमित्त बुकिंग कमी झाली होती. परंतु दिवाळीचा मुहूर्त त्याचबरोबर स्वत:च्या वाहनातच प्रवास करण्याची मानसिकता तयार झाल्याने यंदा चार चाकी वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. - संतोष सगर, शाेरूम मालक

लाखाच्या वरील दुचाकींची मागणी जास्तदिवाळीच्या काळात दुचाकी खरेदी करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. यात स्पोर्टस् बाइकची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. जास्त प्रमाणात तरुण वर्ग याकडे आकर्षिला जात आहे. खरेदीसाठी दिवाळीचा मुहूर्त उपयुक्त असल्याने या सणात वाहन खरेदी जोमाने केली जाते. दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदर तरुण वर्ग दुचाकी शोरूममध्ये गर्दी करायला सुरुवात करतो. यंदा कोरोनाचे सावट असले तरी दुचाकीच्या मागणीत घट झाली नाही. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई