शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोघा संशयितांचा अद्यापही सुगावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 05:03 IST

आठपेक्षा अधिक गुन्हे : फूस लावून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

नवी मुंबई : फूस लावून अल्पवयीन मुलींना एकांतामध्ये नेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांचा शोध नवी मुंबईसह मुंबई व ठाणे पोलीस करत आहेत. अवघ्या एमएमआरडीए क्षेत्रात त्या दोघांवर आठपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मात्र, एका वर्षापासून पोलीस त्यांच्या शोधात असतानाही त्यांची कसलीच माहिती मिळत नसल्याने बक्षिसाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे.अल्पवयीन मुली एकट्या असल्याची संधी साधून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना गतवर्षात शहरात घडल्या आहेत. त्यापैकी काही घटनांमध्ये दोघा संशयितांचे साम्य असल्याचे तपासात समोर आले आहे. वडिलांनी अथवा परिचयाच्या नातेवाइकाने बोलावले असल्याचे सांगून अल्पवयीन मुलींना ते एकांतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकार घडले आहेत. अशा घटनांच्या तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून दोघा संशयितांचे छायचित्र मिळाले आहे. यानुसार त्यांच्याविरोधात वाशी, सानपाडा, नेरुळ, कोपरखैरणे, सानपाडा तसेच खारघर पोलीसठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, ते हाती न लागल्याने त्यांच्यावर दहा हजारांचे बक्षीस घोषित करून नवी मुंबई पोलिसांनी त्यांचे छायचित्र ठाणे, मुंबई पोलिसांनाही पाठवले होते. या दरम्यान त्या ठिकाणीही या दोघांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. तेव्हापासून तीनही आयुक्तालयातील पोलीस या दोघा संशयितांचा शोध घेत आहेत. मात्र, वर्ष उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही. अखेर नवी मुंबई पोलिसांनी या दोघा संशयितांची माहिती देणाºयांच्या बक्षिसात वाढ करून २५ हजार इतके केले आहे. शासनाद्वारे नुकतीच १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाºयाला फाशीची शिक्षा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक अल्पवयीन मुलींना वासनेचे बळी पाडणाºया या दोघांच्या शोधात नवी मुंबई, ठाणे तसेच मुंबई पोलिसांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हा