शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

दोन पोलीस स्टेशनमध्ये विभागला घणसोली नोड

By admin | Updated: July 16, 2016 02:10 IST

सतत घडणाऱ्या घरफोड्या, सोनसाखळी चोरी तसेच हाणामारीच्या घटनांमुळे घणसोलीकरांना सुरक्षेचा प्रश्न सतावत आहे, तर यापूर्वी घडलेल्या जबरी दरोड्याच्या घटनांमुळे

सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईसतत घडणाऱ्या घरफोड्या, सोनसाखळी चोरी तसेच हाणामारीच्या घटनांमुळे घणसोलीकरांना सुरक्षेचा प्रश्न सतावत आहे, तर यापूर्वी घडलेल्या जबरी दरोड्याच्या घटनांमुळे अनेक सोसायट्यांमध्ये भीतीपोटी ठिकठिकाणी लोखंडी ग्रीलचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. परंतु एकच विभाग दोन पोलीस ठाण्यात विभागला गेल्यामुळे उद्भवणारा हद्दीचा वाद टाळण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.सतत घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे घणसोली कॉलनी परिसराला गालबोट लागत आहे. घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी तसेच हाणामारीच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तर चौकीलगतच अनेक गुन्हे घडत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. मोकळ्या भूखंडावर अनधिकृत झोपड्यांमध्ये गुन्हेगारांना आसरा मिळत आहे. तर विभागाचा विकास खुंटला आहे. एकच विभाग दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विभागला गेल्यामुळेही रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. कॉलनीचा निम्मा भाग कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर निम्मा रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्याकरिता दोन्ही पोलीस ठाण्याअंतर्गत एक-एक पोलीस चौकी असली तरी, त्याठिकाणच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर रहिवाशांची नाराजी आहे. चौकीलगतच वाहनचोरी, कारटेप चोरी, सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यास त्याची तक्रार घेण्याचे पोलीस टाळत असल्याचाही रहिवाशांचा आरोप आहे.यापूर्वी सिम्प्लेक्समधील सोसायटीत एका टोळीने सशस्त्र जबरी दरोडा टाकला होता. अशा घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये गुन्हेगारांची दहशत निर्माण झालेली आहे. पर्यायी अनेक सोसायट्यांमध्ये जागोजागी लोखंडी ग्रीलचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. विभागात सुरु असलेली बांधकामे देखील गुन्हेगारी घटनांना कारणीभूत ठरत आहेत. काही वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक संजय पाटील यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला झालेला आहे. लोकवस्तीपासून लांब असलेल्या या मार्गावर सुविधांचा अभाव असल्यामुळे अंधारात दुचाकीस्वारांना अडवून लुटणे, फेरफटका मारण्यासाठी आलेल्या महिलांचे मंगळसूत्र चोरणे असे गुन्हे त्याठिकाणी घडत आहेत.घणसोली कॉलनीकरिता स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता आहे. सध्या घणसोली कॉलनीचा विभाग दोन पोलीस ठाण्यात विभागला गेला आहे. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी अथवा घडलेल्या गुन्ह्याची तक्रार करायची असल्यास नागरिकांची गैरसोय होत आहे. यावरून नागरिक व पोलीस यांच्यात वादाचे प्रकारही घडत आहेत. शिवाय अनेकदा हद्दीचा वाद उद्भवल्यास रहिवाशांना इकडून तिकडे पळावे लागत आहे.- प्रशांत पाटीलनगरसेवक, प्रभाग ३२आरक्षित भूखंडाचा अद्याप विकास झालेला नसल्याने त्यावर अतिक्रमण झाल्याचे पहायला मिळत आहे. काही आडोशाची ठिकाणे गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. त्याठिकाणी मद्यपान, नशा करुन आपसात हाणामारीचे प्रकार देखील घडत आहेत, तर याच गुन्हेगारांना अनधिकृत झोपड्यांमध्ये लपण्यासाठी जागा मिळत आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणे हटवून जागेला कुंपण घालणे गरजेचे आहे.- श्याम सराफ, घरोंदाघरफोडी, सोनसाखळी चोरी अशा घटनांमुळे महिलांना घराबाहेर निघण्याची देखील भीती वाटत आहे. रेल्वेस्थानकासमोरील मोकळ्या जागेवर गुन्हेगारांनी कब्जा मिळवला आहे. रात्रीच्या वेळी त्याठिकाणी झाडीमध्ये गुन्हेगारांच्या पार्ट्या रंगत असून हे भयाण दृश्य लगतच्या इमारतीमधील घरांमधून पहायला मिळत आहे. हेच गर्दुल्ले परिसरात गुन्हे करत असल्याची शक्यता आहे. यामुळे रात्रीच्यावेळी महिलांना रस्त्याने पायी जाताना मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.-निर्मला पांडे, सेक्टर ५सेक्टर ६ च्या परिसरात घडणाऱ्या चोरी, घरफोडीच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. परिसरातल्या मोकळ्या मैदानांसह रेल्वे पटरीलगत आडोशाच्या जागेत गुन्हेगारांचे अड्डे झालेले आहेत. काही महिन्यांपूर्वीच एका रिक्षाचालकाचा मृतदेह देखील त्या ठिकाणी आढळलेला आहे. रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी गैरसोय होत असून गुन्हेगारांची नजर चुकवत घरापर्यंत पोहचावे लागत आहे.- विकास शिरसाट, सेक्टर ६