शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परमशांतीधाम वृद्धाश्रमातील दोघांचा मृत्यू, १६ जण गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:33 IST

पालिकेकडून इतर आश्रमांची चाचपणी सुरू

 

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल मधील तळोजा एमआयडीसीमध्ये असलेल्या परमशांतीधाम वृद्धाश्रमातील ५६ वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ६१ पैकी ५६ जण कोरोनाने बाधित झाले असून यापैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.बाधितांपैकी १६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. १६ वृद्ध नागरिक कामोठे एमजीएम याठिकाणी उपचार घेत आहेत. यापैकी वृद्ध हे ६० ते ८० वयोगटातील आहेत. तर ४० जणांना आश्रमातच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.पालिकेचे आरोग्य विभागाचे पथक या वृद्धांची तपासणी करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. बहुतांश वृद्धांचे कुणीही नातेवाईक नसल्याने वृद्धाश्रम प्रशासन व पालिका प्रशासन मार्फत या वृद्धांचे पुढे उपचार करावे लागणार आहे. शनिवारी या वृद्धांची अँटीजन चाचणी करण्यात आली होती. त्यांनतर बहुतांशी वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती येथील व्यवस्थापक अभय वाघ यांनी दिली. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात येथील वृद्धांचे अतिशय सुरक्षित पद्धतीने देखरेख करण्यात आली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात आश्रमात अतिशय वेगाने कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहावयास मिळाले. पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी येथील आश्रमाची जबाबदारी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून स्वीकारली असून येथील विलगीकरण केलेल्या वृद्धांची पालिकेचे आरोग्य पथक नियमित तपासणी करीत असल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले. आवश्यकता भासल्यास त्वरित येथील वृद्धांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल अशी माहिती ही त्यांनी दिली.

आमदार बाळाराम पाटील पालिका आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ही बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आल्यावर पालिका प्रशासनाने त्वरित वृद्धांना आरोग्य सेवा उपलब्ध होईल याकरिता प्रयत्न सुरु केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या