शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरणाऱ्या दोघा सराईतांना अटक, १७ गुन्ह्यांची उकल

By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 15, 2023 18:30 IST

चोरीच्या मोटारसायकलवरून करायचे गुन्हे .

नवी मुंबई : सोनसाखळी चोरी प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार फरार असून पोलिस त्यांचाही शोध घेते आहेत. या दोघांकडून १७ गुन्ह्यांची उकल झाली आहे. 

शहरात घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुशंघाने गुन्हे शाखा पोलिसांकडून तपास सुरु होता. यासाठी गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सहायक निरीक्षक संदीप गायकवाड, उपनिरीक्षक मानसिंग पाटील, वैभव रोंगे, हवालदार तुकाराम सूर्यवंशी, दीपक डोंगरे, रणजित पाटील, सचिन पवार आदींचे पथक केले होते. त्यांनी घडलेल्या गुन्ह्यांच्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून काही संशयितांची माहिती मिळवली होती. यासाठी पथकाने नवी मुंबईसह ठाणे, मुंबई परिसरात देखील झडती घेतली. त्यामध्ये दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोघांची माहिती मिळताच सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मोहम्मद सादक जाफरी (२१) व कैलास कमलबहादूर नेपाळी (२४) अशी त्यांची नावे आहेत. जाफरी याचा कळंबोली येथील एका गुन्ह्यात सहभाग दिसून आला असून त्याच्याकडून ६ गुन्हे उघड झाले आहेत. यामध्ये सहभागी असलेल्या त्याच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. त्याचप्रमाणे रबाळे येथील एका गुन्ह्यात नेपाळीचा सहभाग दिसून आला असून त्याच्याकडून ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.

नेपाळी हा नेरळला (कर्जत) राहनारा असून जाफरी हा मुंब्राचा आहे. चोरीच्या मोटरसायकल वापरून ते नवी मुंबईसह लगतच्या परिसरात सोनसाखळी चोरी करत होते. यामुळे ते सहजरित्या पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्यांच्या साथीदारांना देखील अटक झाल्यास सोनसाखळी चोरीचे इतरही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यानुसार याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिस अधीक तपास करत आहेत.