शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील दोघांची निवडणुकीत बाजी; मिरजसह जुन्नरमध्ये विजय, चौघांना अपयश

By नामदेव मोरे | Updated: December 2, 2024 06:38 IST

पराभव झालले शशिकांत  शिंदे २०२६ पर्यंत विधान परिषदेवर असल्यामुळे त्यांना अजून दोन वर्षे आमदार म्हणून काम करता येणार असून, विजयी झालेल्यांमध्ये सुरेश खाडे हे मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.

नामदेव मोरे

नवी मुंबई : कर्मभूमी नवी मुंबई असलेल्या सहा उमेदवारांनी राज्याच्या विविध भागांत विधानसभेची निवडणूक लढविली होती. यापैकी सुरेश खाडे आणि शरद सोनावणे या दोघांना यश आले असून, चारजणांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पराभव झालले शशिकांत  शिंदे २०२६ पर्यंत विधान परिषदेवर असल्यामुळे त्यांना अजून दोन वर्षे आमदार म्हणून काम करता येणार असून, विजयी झालेल्यांमध्ये सुरेश खाडे हे मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.

राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामधून अनेक नागरिक नोकरी व्यवसायासाठी नवी मुंबईमध्ये स्थायिक झाले आहेत. यापैकी अनेक जण येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्येही कार्यकरत असून, आपल्या जन्मभूमीमध्येही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत. जन्मभूमीमधील ग्रामपंचायतींपासून ते लोकसभेपर्यंत विविध निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधील चाकरमान्यांची भूमिका महत्त्वाची असते.

या वर्षीच्या निवडणुकीमध्ये येथील सहाजण राज्याच्या विविध भागांतून निवडणूक लढवत होते. यापैकी सांगली जिल्ह्यातील मिरजमधून सुरेश खाडे यांनी ४५ हजार १९५ मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी यापूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. यावेळेस त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

चुरशीची लढत

जुन्नर मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढविणारे शरद सोनावणे यांनीही विजय मिळविला आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. सोनावणे हे बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील व्यापारी आहेत. बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शशिकांत शिंदे यांना कोरेगाव मतदारसंघातून पराभवास सामोरे जावे लागले आहे. उदगीरमधून निवडणूक लढणारे सुधाकर भालेराव, राजापूरमधून अविनाश लाड, वाशीममधून संजू वाडे यांनाही अपयश आले आहे.

मंत्रिमंडळात स्थान मिळणार का?

ऐरोली मतदारसंघातील गणेश नाईक यांनी सहा वेळा निवडणूक जिंकली. तीन वेळेस मंत्रिपद मिळविले. मंदा म्हात्रे बेलापूरमधून सलग तीन वेळा जिंकल्या आहेत. तसेच नवी मुंबईतील दोन उमेदवार विजयी झाले. यात तीनजण भाजपचे असून, त्यांच्यापैकी मंत्रिपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.