नवी मुंबई : पामबीच रोडवर दिवसभरात झालेल्या दोन अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. नेरूळजवळ कारच्या धडकेने पामट्री उन्मळून पडला आहे. वेगामुळे चालकाचा ताबा सुटल्यामुळे हे अपघात झाले आहेत. अलिबागमधील अभय पाटील हे कुटुंबीयांसह कारमधून (एमएच ०६ बीई८१७६) मुंबईला जात होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नेरूळमधील तलावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार दुभाजकामधील पामट्रीवर आदळली.यामध्ये वृक्ष पूर्णपणे उन्मळून पडला आहे. कारमधील हरिभाऊ पाटील व एक महिला जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी सानपाडामधील सूरज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
पामबीच रोडवर दोन अपघात
By admin | Updated: October 23, 2015 00:23 IST