शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
2
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
3
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार
4
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
5
मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल
6
१००% पैसे होणार डबल! पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये ₹२५,००० ची गुंतवणूक देईल लाखोंचा रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
8
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
9
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
10
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
11
मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन!
12
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
13
व्हॉट्‌सॲपची ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग पडली महागात; क्षणात पावणेपाच लाख झाले गायब
14
‘आयटीआर’मधील चलाखी; गुरुजी ‘आयकर’च्या रडारवर
15
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 
16
सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांना १० कोटींचा गंडा, अकोल्यातील महाठगाच्या दिल्लीत आवळल्या मुसक्या
17
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
18
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
19
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
20
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण

टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर

By admin | Updated: October 23, 2016 03:31 IST

आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगीक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. मागील बारा वर्षात या क्षेत्रातील

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगीक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. मागील बारा वर्षात या क्षेत्रातील कंपन्यांनी मोठ्याप्रमाणात स्थलांतर केले आहे. यात टाळेबंदी जाहिर करून आपला गाशा गुंडाळणाऱ्या उद्योजकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. जाचक औद्योगीक धोरण, पायाभूत सुविधांचा अभाव आणि महापालिकेकडून कर वसुलीसाठी केली जाणारी सक्तीची कारवाई आदीचा फटका या क्षेत्रातील उद्योगांना बसल्याचा उद्योजकांचा आरोप आहे.पंचवीस किलोमीटरच्या क्षेत्रफळावर विस्तारलेल्या टीटीसी औद्योगीक क्षेत्रात सध्या लहान मोठो ३५00 हजार युनिटस कार्यरत आहेत. त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे तीन लाख माणसे काम करीत आहेत. या क्षेत्रात एमआयडीसीने सुमारे पाच हजार व्यवसायिक युनिटसाठी जागा देण्याचे प्रस्तावित केले होते. त्यापैकी सुमारे चार हजार उद्योग प्रत्यक्ष कार्यान्वित झाले होते. असे असले तरी महाराष्ट्र शासनाचे जाचक औद्योगीक धोरण, प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत महापालिकेची उदासीनता आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. तर काहींनी अन्य राज्यांत स्थलांतरीत केले आहे. विशेषत: मागील बारा वर्षात या प्रक्रियेने अधिक वेग घेतल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षापूर्वीर् महापे औद्योगीक क्षेत्रातील तीस एकर जागेवर उभरलेल्या पाच बड्या कंपन्यांनी येथील आपले व्यवहार बंद करून गुजरातमध्ये स्थलांतरीत केले आहे. गुजरातचे औद्योगीक धोरण उद्योग वाढील पोषक ठरले आहे. येथील तयार इन्फ्रास्ट्रक्चर आणि कर आकारणीतील पारदर्शकता तरूण उद्योजकांना भूरळ घालीत आहे. त्यामुळे अनेक उद्योजक आपले येथील उद्योग बंद करून गुजरातची वाट धरताना दिसत आहेत. त्यामुळे इतर छोट्या उद्योजकांत व त्याअुषंगाने कामगार वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.पूर्वी या औद्योगिक वसाहतीला रस्ते, पाणी, वीज व इतर प्राथमिक सुविधा एमआयडीसीकडून पुरविल्या जात होत्या. परंतु २00५ पासून या सुविधा महापालिकेडे वर्ग करण्यात आल्या. तेव्हापासून आतापर्यंत विविध करापोटी महापालिकेने येथील उद्योजगांकडून कोट्यवधी रूपयांचा कर वसूल केला आहे. त्याबदल्यात देण्यात येणाऱ्या सुविधा नगण्य असल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. येथील रस्ते, दिवाबत्ती, पाणी पुरवठा, सांडपाणी वाहून नेणारी गटारे आदींची दुरवस्था झाली आहे. यावर्षी तर या परिसरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. याचा फटका या क्षेत्रातील उद्योगांना बसला आहे. यातच महापालिकेने पुन्हा थकीत कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहे. करवसुलीच्या अनेकांना सक्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे उद्योजकांत महापालिकेविषयी नाराजीचे सूर आहेत. एकूणच सध्या निर्माण झालेली परिस्थिती येथील उद्योग वाढीला मारक ठरत असल्याने अनेकांनी स्थलांतराचा मार्ग पत्कारल्याचे बोलले जात आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यात या क्षेत्रातील लहान मोठे जवळपास पंधरा उद्योग बंद करण्यात आले आहेत.सुविधा द्या, मगच करभरणाकर वसुलीसाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. मागील काही वर्षात कराचा भरणा न करणाऱ्या उद्योजकांवर मोठ्याप्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्योजकांत असंतोष निर्माण झाला आहे. मुळात कर आकारण्याचा महापालिकेला कोणताही अधिकार नाही. असे असतानाही आम्ही कर भरायला तयार आहोत. त्याबदल्यात आम्हाला दर्जेदार पायाभूत सुविधा मिळायला हव्यात, अशी येथील उद्योजकांची मागणी आहे.