शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

खेळाचे मैदान हडपण्याचा प्रयत्न

By admin | Updated: September 27, 2016 03:13 IST

खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेला भूखंड हडपण्याचा प्रयत्न घणसोली येथे सुरू आहे. त्याकरिता संबंधिताने परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या जलवाहिनीवर देखील मातीचा

नवी मुंबई : खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेला भूखंड हडपण्याचा प्रयत्न घणसोली येथे सुरू आहे. त्याकरिता संबंधिताने परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या जलवाहिनीवर देखील मातीचा भरणा केलेला आहे. परंतु या संपूर्ण अनधिकृत बांधकामाकडे सिडको व पालिका अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.घणसोली सेक्टर ५ येथील नाल्यालगतचा भूखंड सिडकोने संबंधिताला सिलिंडर गोडाऊनसाठी दिलेला आहे. मात्र सध्या त्याठिकाणी तीन मजली इमारत उभी असून त्यामध्ये शाळा भरवली जात आहे. सिडकोने ज्या वापरासाठी हा भूखंड दिलेला आहे, त्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी हा भूखंड वापरला जात आहे. यासंदर्भात यापूर्वी अनेकांनी सिडको व पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही सदर बांधकामावर कारवाई झालेली नाही. अशातच संबंधिताने त्या भूखंडालगतच असलेले खेळाचे मैदान देखील बळकावण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. काही दिवसांपूर्वी सिलिंडर गोडाऊनचा भूखंड व खेळाचे मैदान यादरम्यानची भिंत तोडण्यात आलेली होती. त्यानंतर दिवसाढवळ्या खेळाच्या मैदानाचा निम्म्याहून अधिक भाग ताब्यात घेवून भिंत बांधण्याचे काम त्याठिकाणी सुरु आहे. याशिवाय संबंधिताने नाल्यालगतच्या जलवाहिनीवर देखील मातीचा भरणा करुन ताब्यातील भूखंडाचे क्षेत्र वाढवले आहे. तर त्याठिकाणी भूमिगत जलवाहिनी होती हे कोणाच्या नजरेस येवू नये याकरिता जलवाहिनीच्या भागावर झाडे लावण्यात आली आहेत. यामुळे भविष्यात जलवाहिनी फुटल्यार्स परिसराचा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.घणसोलीतील नागरिकांना खेळाचे मैदान, उद्यान, शासकीय रुग्णालय अशा सुविधांपासून गेली १५ वर्षांपासून वंचित राहावे लागले आहे. अशातच नागरी सुविधांचे भूखंड बळकावले जाऊ लागल्याचा संताप स्थानिक रहिवासी राजू गावडे यांनी व्यक्त केला आहे. सुविधांच्या अभावी रहिवाशांचा प्रशासनाप्रति रोष वाढत चालला आहे. मैदाने, उद्यान यासाठी भूखंड राखीव असतानाही त्याचा विकास झालेला नाही. त्यामुळेच भूखंड हडपण्याचे प्रकार घडत असून, त्याकडे दोन्ही प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे या विरोधात उपोषण केले जाणार असून भूखंड हडपणाऱ्या संबंधितांवर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचेही गावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)