शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांना उष्माघातापासून वाचविण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: April 24, 2017 02:35 IST

सीबीडी सेक्टर ९ परिसरातील ग्रीन व्हॅली पार्क परिसरातील सर्व झाडांना पाण्याने भरलेले प्लास्टीकचे भांडे लावण्यात आले आहे.

नवी मुंबई : सीबीडी सेक्टर ९ परिसरातील ग्रीन व्हॅली पार्क परिसरातील सर्व झाडांना पाण्याने भरलेले प्लास्टीकचे भांडे लावण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे पक्ष्यांची पाण्याची तहान भागविण्याकरिता या परिसरातील २० हून अधिक झाडांना अशा प्रकारचे भांडे लटकविण्यात आले आहे. जेणेकरून झाडावर विश्रांती घेण्याबरोबरच पक्ष्यांची पाण्याची तहानही भागविता येऊ शकते. ग्रीन व्हॅली पार्कमध्ये सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनही वेळेस बहुसंख्य नागरिक जॉगिंग तसेच व्यायामासाठी येतात. याठिकाणी शेकडो झाडे पहायला मिळत असून याठिकाणी व्यायामासाठी येणारे नागरिक आवर्जून झाडांना पाणी घालतात. प्लास्टीकचे रिकामे डब्यांना दोरी तसेच तारेने बांधून ही भांडी झाडांच्या फांदीवर लटकविण्यात आली आहे. याठिकाणी येणारे निसर्गप्रेमी आवर्जून येथील झाडे तसेच झाडांना लावण्यात आलेल्या भांड्यांमध्ये पाणी घालतात. याठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली जात असून ज्येष्ठ नागरिक, निसर्गप्रेमी या सर्व झाडांची देखभाल करतात. वर्षभरात याठिकाणी ५० हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये फळ झाडे, औषधी वनस्पतींचा समावेश आहे. परिसरातील निसर्गप्रेमी येथील वृक्षसंपत्तीची देखभाल घेत असून झाडांना पाणी घालणे, छाटणी करणे आदी कामेही या नागरिकांकडून केली जात आहेत. टाकाऊ प्लास्टीकची भांडी, डबे आदींचा वापर करून पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी निसर्गप्रेमींना स्वत: पाणी साठविण्याची भांडी तयार केली आहेत. नागरिकांनी घरातील खिडक्या, टेरेस,उंचावरील मोकळ्या जागेत पक्ष्यांची तहान भागविण्याकरिता पाण्याने भरलेली भांडी ठेवण्याचे आवाहन ग्रीन व्हॅली पार्कमधील वॉकर्स असोसिएशनच्या नागरिकांनी केले आहे.