शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकांच्या आंदोलनाला नवी मुंबईत हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक, ४० जण ताब्यात 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 1, 2024 17:42 IST

या घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी तणाव होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अवजड वाहनांच्या चालकांनी केलेल्या रस्ता रोकोच्या ठिकाणी पोलिसांवर गडफ़ेक केल्याची घटना जेएनपीटी मार्गावर घडली. यामध्ये काही पोलिस जखमी झाले असून याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी ४० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी तणाव होता.

अपघात करून पळणाऱ्या चालकांवर कठोर कारवाईसाठी कायदा करण्यात आला आहे. या कायद्याला वाहन चालकांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी जेएनपीटी मार्गावर उलवे येथे वाहन चालकांनी रास्ता रोको केला होता. अचानक झालेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे त्याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे एनआरआय पोलिसांचे पथक त्याठिकाणी गेले होते. यावेळी त्यांनी आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलक चालकांनी पोलिसांवर तसेच रस्त्यांवरील वाहनांवर दगडफेक करण्यास सुरवात केली. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले तर काही पोलिसही जखमी झाले आहेत. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना देखील बळाचा वापर करावा लागला. त्यामध्ये चाळीस आंदोलकांना ताब्यात घेतले असल्याचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. त्यांच्यावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान शासन निर्णयाविरोधात आंदोलन करताना चालकांनी कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये असे आवाहनही उपायुक्त पानसरे यांनी केले आहे.

या घटनेमुळे उलवे परिसरात तणाव निर्माण होऊन उलवे मार्गे जाणारी वाहने पामबीच व पर्यायी मार्गाने वळवली जात होती. यामुळे अनेक ठिकाणी अचानक वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर सदर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई