शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंग फाडून तणाव निर्माण करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:11 IST

तुर्भे गावातील राजकीय होर्डिंग फाडून तणाव निर्माण करणाऱ्याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप मंगल पाटील (५८) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून सूडबुध्दीने होर्डिंग फाडल्याचे उघड झाले आहे.

नवी मुंबई : तुर्भे गावातील राजकीय होर्डिंग फाडून तणाव निर्माण करणाऱ्याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप मंगल पाटील (५८) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून सूडबुध्दीने होर्डिंग फाडल्याचे उघड झाले आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्हीमुळे संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.कोपरी येथे राहणारे रवींद्र हरड यांनी तुर्भे परिसरात शिवसेनेचे होर्डिंग लावले होते. मात्र रविवारी सकाळी काही होर्डिंग फाटल्याचे निदर्शनास आले.अज्ञाताकडून राजकीय द्वेषातून ते फाडण्यात आले होते. यामुळे घडलेल्या प्रकाराची त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. यादरम्यान घटनास्थळालगतचे सीसीटीव्ही तपासले असता, रात्रीच्या वेळी एक व्यक्ती होर्डिंग फाडताना आढळून आली.सदर व्यक्तीची पोलिसांनीओळख पटवली असता प्रदीपपाटील (५८) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. ही व्यक्तीतुर्भे गावातीलच राहणारी असून तक्रारदार हरड यांच्या परिचयाची व राजकीय विरोधक आहे. यामुळे राजकीय द्वेषातून त्याने हरड यांनी लावलेले शिवसेनेचे होर्डिंग फाडल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटककेली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Arrestअटक