शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लेडीज सर्व्हिस बारविरोधात धाडसत्र

By admin | Updated: October 15, 2015 02:02 IST

शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. जुगार अड्डे बंद केल्यानंतर आता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लेडीज सर्व्हिस बारवर लक्ष केंद्रित केले आहे

नवी मुंबई : शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. जुगार अड्डे बंद केल्यानंतर आता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लेडीज सर्व्हिस बारवर लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत १६ बारवर छापे टाकून तब्बल ८० महिला वेटरवर गुन्हे दाखल केले आहेत. नवी मुंबई पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप व गुन्हे शाखेचे उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सोनसाखळी चोरी, घरफोडीसह अनेक गुन्ह्यांमधील अनेक टोळ्यांना जेरबंद केले आहे. शहरातील सर्व जुगार अड्डे बंद केले आहेत. लॉटरी, मसाज सेंटर, अवैध दारू विक्री व इतर सर्व ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. पोलिसांनी आता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लेडीज सर्व्हिस बारवरही कडक कारवाई सुरू केली आहे. ज्या बारमध्ये नोकरनामा नसतानाही महिला वेटर काम करत असतील तर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जात आहे. महिला वेटर अश्लील हावभाव करत असतील किंवा इतर अवैध गोष्टी होत असल्याचे निदर्शनास आले तरी तत्काळ कारवाई केली जात आहे. आतापर्यंत तब्बल १६ बारवर कारवाई केली असून अश्लील हावभाव करणाऱ्या व नोकरनामा नसलेल्या ८० महिला वेटरवर कारवाई केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलीस आयुक्त प्रभात रंजन उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन बागडे व त्यांच्या टीमने मंगळवारी दोन ठिकाणी धाडी टाकल्या. कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील बोनकोडे गाव सेक्टर १२ मधील स्वागत बारवर छापा टाकला. या छाप्यात ६ महिला वेटर गैरवर्तन करत असल्याचे निदर्शनास आले. हॉटेलमधील नोकरनामे तपासले असता या महिलांचा तपशील नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. सानपाडा रेल्वे स्टेशनच्या समोरील नीलम बारवरही धाड टाकली. सदर ठिकाणी तीन महिला गैरवर्तन करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम ११० व ११७ अन्वये कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलीस हवालदार संतोष शिंदे, विनोद भोईर, सचिन शेरमकर, विनोद चौधरी, सचिन कोठूळे, तस्लीम पठाण, अमोल भोसले, रितेश धाडकर यांनी सहभाग घेतला होता. पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईचे शहरावासीयांनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)