शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये तिरंगी लढत?

By admin | Updated: April 27, 2017 00:09 IST

पनवेल महानगरपलिकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेना व भाजपा यांची युती होत नसल्याचे खात्रीशीर

पनवेल : पनवेल महानगरपलिकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेना व भाजपा यांची युती होत नसल्याचे खात्रीशीर वृत्त असून पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर आपले नशीब आजमावत असणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पनवेलमध्ये शेकाप आघाडी, भाजपा व शिवसेना यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसणार आहे.प्रथमच होत असलेल्या पनवेल महापालिकेची निवडणूक साऱ्याच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासूनच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती. शेकापने यापूर्वीच राष्ट्रवादी व काँग्रेससोबत घरोबा करून आघाडी तयार केली आहे. मात्र भाजपा व शिवसेना यांची युती करण्यासाठी भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी प्रयत्न करताना दिसत आहेत. असे असले तरी सेना पक्षप्रमुखांना हे मान्य नसल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढून पनवेल महापालिकेत आपली ताकद दाखवून द्या असा आदेश शिवसैनिकांना दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवसेना पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे एमआयएम, रासप, स्वाभिमानी शेतकरी, संभाजी ब्रिगेड यांची नवीन मोट बांधली जात आहे. तिसऱ्या आघाडीच्या रूपाने हे पक्ष महापालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेलमध्ये आपले अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत आहे. मनसेचे उमेदवार देखील महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार आहेत.निवडणुकीची घोषणा होऊन पाच ते सहा दिवस उलटून गेलेले असले तरी देखील शेकाप आघाडी व भाजपा यांनी आपापले उमेदवार घोषित केलेले नाहीत. काही दिवसातच हे पक्ष आपले उमेदवार घोषित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण खऱ्या अर्थाने मे महिन्यातच तापणार आहे. रायगड जिल्ह्यातील पहिलीच महापालिका असल्याने या निवडणुकीत सारेच पक्ष आपली ताकद दाखविण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र भाजपा व शिवसेना स्वतंत्र लढल्याने शेकाप आघाडी त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी तालुक्यात व महापालिका क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेची पहिलीच निवडणूक तिरंगी होणार असल्याचे दिसत आहे. याबाबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदेश बांदेकर यांच्याशी संपर्क साधला असता स्वबळाचा निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिकृत अशी कोणतीही घोषणा झालेली नसल्याचे देखील सांगण्यात आले. (वार्ताहर)