शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील तब्बल ३० उमेदवार कोट्यधीश

By admin | Updated: February 15, 2017 04:49 IST

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पनवेल तालुक्यातील आठ मतदारसंघांतील २३ पैकी १३ उमेदवार कोट्यधीश आहेत. तर पंचायत समितीसाठी

मयूर तांबडे / पनवेलजिल्हा परिषद निवडणुकीसाठी पनवेल तालुक्यातील आठ मतदारसंघांतील २३ पैकी १३ उमेदवार कोट्यधीश आहेत. तर पंचायत समितीसाठी तालुक्यातील १६ मतदारसंघांमध्ये उभे असलेले ३९ उमेदवारांपैकी १७ उमेदवार कोट्यधीश आहेत. कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांमध्ये भाजपा, शेकाप व काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदांसाठी उभे असलेल्या राजेश्री भोपी या महिला उमेदवाराची संपत्ती पन्नास कोटींहून अधिक आहे. जिल्हा परिषदेत शेकापचे ७ तर भाजपाचे ४, अपक्ष १, बसपा १ उमेदवार, तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभे असलेले शेकापचे ६, भाजपाचे ८, काँग्रेसचे ३ उमेदवार कोट्यधीश आहेत. उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रासोबत दाखल केलेल्या संपत्ती विवरणाच्या आधारावर ही माहिती मिळाली. पनवेल पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान आहे. पनवेलमध्ये भाजपाविरोधात शेकाप काँग्रेस आघाडी अशी लढत होत आहे. नोटाबंदीमुळे ग्रामीण भागात झालेली नागरिकांची आर्थिक कोंडी, शेतकऱ्यांचा खालावलेला आर्थिक दर्जा आणि इतरही महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीत चर्चेत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना संपत्तीचा तपशील उमेदवारांनी दिला आहे. निवडणुकीत उभे असलेल्या भाजपा, काँग्रेस, शिवसेना, शेकापच्या ९ उमेदवारांवर मारहाणीचे, खुनाचा, तसेच दुखापत पोहोचवण्याचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा परिषदेतील वावंजे येथील शिवसेनेच्या उमेदवार सविता कातकरी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पाली-देवद येथील भाजपाचे उमेदवार अमित जाधव यांच्यावर जमाव करून हत्यारानिशी दंगा करून दुखापत पोहोचविण्याचा गुन्हा दाखल आहे. गुळसुंदे येथील शेकापचे उमेदवार राजू गणा पाटील यांच्यावर जाणूनबुजून दुखापत पोहोचवण्याचा एक गुन्हा दाखल आहे.