शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

स्वप्निलला श्रद्धांजली

By admin | Updated: July 25, 2016 03:15 IST

आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झालेल्या स्वप्निल सोनवणे याची रविवारी शोकसभा झाली. यावेळी ६०० हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून स्वप्निलला श्रद्धांजली वाहिली

नवी मुंबई : आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झालेल्या स्वप्निल सोनवणे याची रविवारी शोकसभा झाली. यावेळी ६०० हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून स्वप्निलला श्रद्धांजली वाहिली. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय देखील यावेळी उपस्थित होते.नेरूळ येथे राहणाऱ्या स्वप्निल सोनवणे (१५) याची मंगळवारी रात्री आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी दोघा पोलिसांचेही निलंबन करण्यात आलेले आहे. स्वप्निलच्या हत्येबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, घडलेल्या घटनेचाही निषेध नोंदवला जात आहे. रविवारी स्वप्निलच्या राहत्या परिसरात नेरूळमधील सीबीआय कॉलनीत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेडकरी चळवळीतील प्रमुख्य व्यक्तींसह नगरसेविका नेत्रा शिर्के, नगरसेवक संजू वाडे, आरपीआयचे महेश खरे, जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ, यशपाल ओहोळ, एल. आर. गायकवाड, अंकुश सोनवणे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच सुमारे ६०० हून अधिक नागरिक उपस्थित होते. त्यांनी स्वप्निलच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहत त्याच्या आठवणींना उजाळा दिला. ज्या इमारतीमध्ये स्वप्निल सहकुटुंब राहत होता, त्या इमारतीमधील अनेक कुटुंबीयांशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते. यामुळे स्वप्निलच्या हत्येने सोनवणे कुटुंबीयांसह इतर अनेक कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. घटनेच्या निषेधार्थ शांती रॅलीचे देखील आयोजन केले होते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव आपसी समझोता करीत रॅलीऐवजी श्रद्धांजली सभा घेण्यात आली.