शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

आदिवासी विद्यार्थ्यांचा संताप

By admin | Updated: August 21, 2015 23:47 IST

एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या कार्यकक्षेतील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या तब्बल २५० ते ३०० विद्यार्थ्यांनी योग्य सोयी-सुविधा

पेण : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या कार्यकक्षेतील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या तब्बल २५० ते ३०० विद्यार्थ्यांनी योग्य सोयी-सुविधा मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा घेतला. सरकारच्या नियमांप्रमाणे सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी गेले वर्षभर आदिवासी मंत्री, आयुक्त, सहआयुक्त ते आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा करुनदेखील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांपासून सतत वंचित राहावे लागले आहे.चालू शैक्षणिक वर्षात वसतिगृहाच्या सोयी-सुविधा, प्रवेश प्रक्रिया, स्कॉलरशीप याबाबत प्रकल्प कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी वर्गाला वारंवार अर्ज विनवण्या करुनदेखील समस्या जैसे थे राहिल्याने संतप्त झालेल्या ३०० आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी कार्यालयीन वेळेपासून पेणच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे कामकाज बंद पाडले. इतकेच नव्हे तर स्वत:ला सर्व विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयात कोंडून घेतले आहे. पोलीस डीवायएसपी दिलीप शंकरवार व पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांनी समजूत घातल्यावरही बंदिस्त विद्यार्थ्यांनी कार्यालयाबाहेर पडण्यास नकार दर्शविला व मागण्या घेईपर्यंत आंदोलनाचा इशारा विद्यार्थी प्रतिनिधी विकास नाडेकर यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागांतर्गत मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा, आरोग्यसेवा, अन्न, पिण्याचे पाणी, मुलींची सुरक्षितता, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, राहण्यायोग्य इमारत, संगणक पुरवठा या शैक्षणिक सोयी-सुविधा व मूलभूत गरजा यांची तरतूद असतानाही सुविधा देण्यात अधिकारी चालढकल करीत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.आदिवासी कल्याण योजनांच्या ठेकेदारांवर मेहरबान असणारे प्रकल्प अधिकारी मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आम्ही शिकायचे की या समस्यांच्या पूर्ततेसाठी यांचे उंबरठे झिजवायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे. एवढे करूनही प्रकल्प अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यांनी सांगितले. प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांनी हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांना आमदारांच्या रायगड समितीची भेट घेऊ दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे १३ वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयात येवून मागण्या मान्य होईपर्यंत कामकाज बंद पाडले. सरकारकडून शैक्षणिक सुविधा, आरोग्यसेवा, अन्न, पिण्याचे पाणी, मुलींची सुरक्षितता, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, राहण्यायोग्य इमारत, संगणक पुरवठा या शैक्षणिक सोयी-सुविधा व मूलभूत गरजा पुरवण्यात दिरंगाई होत असल्याचे विद्यार्थी सांगतात.