कर्जत : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह नानामास्तर नगर कर्जत येथे आहे. या वसतिगृहातील मुले आपल्या विविध मागण्यांसाठी तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. त्या विद्यार्थ्यांची शुक्रवारी रात्री एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणच्या प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांनी भेट घेऊन चर्चा केली, त्यानंतर रात्री उशिरा उपोषण सोडण्यात आले. गुरुवारी रात्री नेरळ येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण सोडले.एकात्मिक विकास प्रकल्प पेणअंतर्गत १३ आदिवासी वसतिगृह आहेत. त्यापैकी एक कर्जत शहरातील मुद्रे नानामास्तर नगरमध्ये भाड्याच्या इमारतीत आहे . वसतिगृहात विद्यार्थी राहतात परंतु त्यांना आवश्यक सोयी-सुविधा मिळत नसल्याने अनेक वेळा या विद्यार्थ्यांनी शासकीय दरबारी अर्ज, विनवण्या, मोर्चे, आंदोलने केली. परंतु काहीच उपयोग झाला नाही. तसेच पेण येथील प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांची बदली करावी याविषयी आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू होते. स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शिवसेनेचे संघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, बाळाजी विचारे आदींनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली व उपोषण सोडण्याची विनंती केली मात्र विद्यार्थ्यांनी आपला हेका कायम ठेवला. तिसऱ्या दिवशी उपोषणाचे कारण अचानक बदलण्यात आले. प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांच्या बदलीऐवजी जी.आर. प्रमाणे आम्हाला सुविधा द्या, अशी मागणी फलकावर झळकली. सायंकाळी स्थानिक नगरसेविका अरु णा वायकर यांच्या समवेत महिला बचत गटाच्या सदस्याही तेथे उपस्थित होत्या. रात्री प्रकल्प अधिकारी दाभाडे आदिवासी मुलांच्या वसतिगृहात आल्या.
आदिवासी विद्यार्थ्यांनी सोडले उपोषण
By admin | Updated: September 7, 2015 04:00 IST