शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या अरुणोदय चौकातील झाडे होरपळली पाण्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:05 IST

लाखो रूपयांचा खर्च गेला वाया : सिडकोने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क कळंबाेली : पनवेल रेल्वे स्थानकासमोरील अरुणोदय चौकाचे सिडकोकडून सुशोभीकरण करण्यात आले. त्याकरिता  लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु देखभालीकडे सिडकोकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने लावलेली शोभेची झाडे पाण्याविना सुकून गेली आहेत. त्यामुळे परिसरातील हिरवाई गायब झाली आहे. याकडे सिडको प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत  आहे. 

पनवेल रेल्वे स्थानकासमोरील अरुणोदय चौकाचे २०११ साली सुशोभीकरण करण्यात आले आहे. या चौकातील  सर्कलमध्ये शोभेची वेगवेगळी झाडे लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर डिझाईनसह  शिल्पही उभारण्यात आले आहे. २६ मार्च २०११ साली  सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे   यांच्या  हस्ते या सुशोभीकरण करण्यात आलेल्या चौकाचे उद्घाटन करण्यात आले. चौकातील झाडे,  लाईट लावल्याने परिसर उजळला होता. झाडांमुळे हिरवाई आली होती. देखभालीसाठी  सिडकोकडून व्यवस्था करण्यात आली होती. परंतु याकडे सिडको प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसाळ्यात  मोठ्या प्रमाणात गवत वाढते तर उन्हाळ्यात झाडे पूर्णपणे सुकतात. सद्य:स्थितीत ही झाडे पूर्णत: होरपळली आहेत.  झाडांच्या फांद्यांवरील  पाने गळून गेली आहेत. लहान झाडेदेखील पाण्याविना जळाली आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा करण्यात आलेला खर्च वाया जात आहे. उभारलेले शिल्पही धूळ उडून खराब झाले आहे. त्याकडेसुद्धा दुर्लक्ष झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

जागोजागी साचलाय कचराअरुणोदय चौकात सर्कलला लोखंडी  कम्पाउंड करण्यात आले आहे. त्याचा कलर उडून लोखंड गंजले आहे. जागोजागी कचरा फेकण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बाजूला झोपडपट्टी आहे. तसेच या ठिकाणी गर्दुल्ल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. झोपडपट्टीधारकांकडून येथील कम्पाउंडवर धुतलेले  कपडे सुकविले जात आहेत.  

टॅग्स :panvelपनवेलfireआग