शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ते गोवा पायी प्रवास : अवयवदानाच्या जागृतीसाठी ज्येष्ठांची दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 02:21 IST

अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी द फेडरेशन आॅफ आॅरगन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन या संघटनेच्या वतीने मुंबई ते गोवापर्यंत दिंडी काढण्यात आली आहे.

नवी मुंबई : अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी द फेडरेशन आॅफ आॅरगन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन या संघटनेच्या वतीने मुंबई ते गोवापर्यंत दिंडी काढण्यात आली आहे. नवी मुंबईत या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करून त्यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी अद्यापही मोठ्या प्रमाणात गैरसमज आहे. मृत्यूनंतर शरीराचा एखादा अवयव दान केल्यास पुढच्या जन्मी त्या अवयवाचे अपंगत्व लाभते, असे गैरसमज अनेकांमध्ये आहेत. त्यामुळे नेत्र, त्वचा, देह अशा अवयवांचे दान करण्याची भीती व्यक्त केली जाते. परिणामी, एखाद्या दुर्घटनेत मृत्यूशी झुंज देत असलेल्यांना आवश्यक अवयव उपलब्ध न झाल्यास, जरी त्यांचे प्राण वाचले तरीही अपंगत्व आलेले असते. या परिस्थितीमुळे सद्यस्थितीला अनेक जण डोळे, त्वचा याच्या दात्यांच्या प्रतीक्षेत काही जण अंथरुणाला खिळून आहेत. तर देहदाते नसल्याने वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन संशोधन करणाºया डॉक्टरांनाही चाचणीकरिता देह मिळत नाहीत. अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी पुरुषोत्तम पवार यांनी द फेडरेशन आॅफ आॅरगन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन या संघटनेची स्थापना करून गतवर्षी प्रथम जनजागृती मोहीम हाती घेतली. ऐरोली, घणसोली, वाशी, सीबीडी येथील नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. ही दिंडी घणसोली परिसरात आली असता, त्या ठिकाणी प्रभात चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. प्रशांत थोरात व वारकरी संप्रदायाच्या वतीने कीर्तनकार सुनीलबुवा रानकर, माजी नगरसेवक दीपक पाटील यांनी दिंडीचे स्वागत केले. त्यानंतर टाळ, मृदुंगाच्या तालावर घणसोली गावात जनजागृती दिंडी काढण्यात आली.

टॅग्स :Organ donationअवयव दान