शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिडको वसाहतीत कचऱ्याचे ढीग

By admin | Updated: May 7, 2016 00:47 IST

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिडको वसाहतीतील कचरा उचलला गेलेला नाही. त्यामुळे कचरा रस्त्यावर पसरला असून प्रचंड दुर्गंधी येत आहे, तर नवीन पनवेलमध्ये कचऱ्याच्या गाड्याही

पनवेल : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिडको वसाहतीतील कचरा उचलला गेलेला नाही. त्यामुळे कचरा रस्त्यावर पसरला असून प्रचंड दुर्गंधी येत आहे, तर नवीन पनवेलमध्ये कचऱ्याच्या गाड्याही तुडुंब भरून उभ्या आहेत. तळोजा येथील डम्पिंग ग्राऊंडवर सिडको वसाहतींमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. मात्र कचऱ्याची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे आरोग्य धोक्यात येत असल्याचे सांगून स्थानिकांकडून याठिकाणी कचरा टाकण्यास विरोध करण्यात येत आहे. याच कारणामुळे गुरुवारी तळोजा येथील डम्पिंग ग्राऊंडविरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. सिडकोने नियुक्त केलेल्या बीवीजी कंपनीकडून दररोज २५० ते ३०० टन कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. पावसाळ्यात या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी सुटत असल्याने या डम्पिंग ग्राऊंडलाच विरोध होत आहे. बुधवारी दुपारी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डम्पिंग ग्राऊंडच्या गेटवर कचऱ्याच्या गाड्या अडवल्या आणि कचरा टाकण्यास विरोध केला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर व इतर वसाहतीत कचरा साचून आहे. सिडकोने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पोलीस बंदोबस्तात कचरा डम्प करण्यात आला तरी सुध्दा आजच्या घडीला जवळपास एक हजार टन कचरा रस्त्यावर पडून आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून पादचाऱ्यांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. नवीन पनवेल येथील सिडको टर्मिनसमध्ये कचरा भरून गाड्या उभ्या आहेत. मात्र हा कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)कचऱ्याची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावली जाते, मात्र तरी सुध्दा गाड्या अडविण्यात आल्या. याबाबत तळोजा पोलीस ठाण्याला पत्र देण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात गुरुवारपासून कचरा टाकण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच वसाहतींमधील सगळा कचरा उचलला जाईल. - गिरीश रघुवंशी, कार्यकारी अभियंता, घनकचरा व्यवस्थापन, सिडको