शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसह महापालिकेमुळे सानपाडामध्ये झाली वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:49 IST

सानपाडामध्ये सायन-पनवेल महामार्गाला समांतर असणाऱ्या रोडवर पोलीस व महापालिकेमुळे वाहतूक समस्या वाढली आहे. दत्तमंदिरकडे जाणा-या रोडवर एक बाजूला ‘नो पार्किंग’ व दुस-या बाजूला ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा फलक लावण्यात आला आहे.

नवी मुंबई : सानपाडामध्ये सायन-पनवेल महामार्गाला समांतर असणाऱ्या रोडवर पोलीस व महापालिकेमुळे वाहतूक समस्या वाढली आहे. दत्तमंदिरकडे जाणा-या रोडवर एक बाजूला ‘नो पार्किंग’ व दुसºया बाजूला ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा फलक लावण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने लावलेल्या फलकांमुळे वाहतुकीची समस्या वाढली असून, नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.शहरामधील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे; परंतु दोन्ही संस्थांच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक ठिकाणी समस्या सुटण्याऐवजी वाढू लागली असून, यामध्ये सानपाडा दत्तमंदिर रोडचाही समावेश आहे. सायन-पनवेल महामार्गाला लागून रेल्वे स्टेशनकडून मंदिराकडे जाणारा समांतर रस्ता बनविला आहे. या परिसरामध्ये पृथ्वी पार्क व बाजूच्या इमारतीमध्ये बँकेसह इतर व्यावसायिक गाळे असून निवासी संकूल आहेत. निवासी संकुलामधील व या परिसरातील वाहन विक्रीचा व्यवसाय करणाºयांची वाहने रोडच्या एका बाजूला उभी केली जात होती. एक बाजूला वाहने उभी राहत असल्यामुळे वाहतूककोंडी होत नव्हती.वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सूचना व हरकती न घेता, वास्तव स्थितीचा विचार न करता, ज्या बाजूला वाहने पार्किंग करणे आवश्यक आहे त्या बाजूला नो पार्किंगचे फलक लावले आहेत. ज्या बाजूला वाहने उभी करणे सुरक्षित नाही व वाहतुकीसाठी योग्यही नाही त्या बाजूला पे अ‍ॅण्ड पार्कचे फलक लावले आहेत. वास्तविक पे अ‍ॅण्ड पार्कला या परिसरामध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिलेली नाही. पे अ‍ॅण्ड पार्क प्रत्यक्षात सुरूही केलेले नसून, ते सुरू करणे वाहतुकीसाठी योग्यही होणार नाही; परंतु या दोन्ही फलकांमुळे वाहनधारक संभ्रमात आहेत. पूर्वी एक बाजूला वाहने उभी केली जात होती. आता दोन्ही बाजूला वाहने उभी राहत असून, त्यामुळे वाहतूककोंडी वाढली आहे.वाहतूक पोलीस व महापालिकेने चुकीच्या पद्धतीने फलक लावले आहेत. यामुळे वाहतूककोंडी वाढली आहे. पे अ‍ॅण्ड पार्कचे बोर्ड काढण्यात यावेत व नो पार्किंगचे फलक काढून त्या ठिकाणी पार्किंगचे फलक लावण्यात यावेत.- अरुण शिंदे, वाहनधारकदत्तमंदिर रोडवर नो पार्किंगचे फलक लावलेल्या बाजूलाच वाहने उभी करणे सुरक्षित आहे. पे अ‍ॅण्ड पार्कच्या बाजूला नो पार्किंगचे बोर्ड लावण्याची गरज आहे. पूर्वीप्रमाणे व्यवस्था न केल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.- सचिन पवार, रहिवासी, सानपाडा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई