शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूककोंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 03:31 IST

रबाळेमध्ये चक्काजाम : तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर नवीन पुलाची गरज

नवी मुंबई : दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्गाचे बांधकाम केल्यानंतरही ठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूककोंडी जैसे थे आहे. रबाळे उड्डाणपुलावरही चक्काजाम होऊ लागले आहे. सर्वात गंभीर स्थिती तुर्भे स्टोअर्सजवळ असून तेथे नवीन उड्डाणपूल बांधल्याशिवाय कोंडी सुटणार नाही.नवी मुंबईमधील सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या रोडमध्ये ठाणे- बेलापूरचाही समावेश आहे. राज्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत या परिसरामध्ये आहे. याशिवाय ठाणे व मुलुंडसह कल्याणकडे जाणारी वाहने या रोडवरून जात असतात. वारंवार होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शासनाने एमएमआरडीएच्या माध्यमातून घणसोली ते तळवली दरम्यान १४५१ मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला आहे.सविता केमिकलजवळ ५७६ मीटर लांबीचा उड्डाणपूल व महापे येथे भुयारी मार्गाचे काम केले आहे. तब्बल १५५ कोटी रूपये खर्च करून हे तीन प्रकल्प सुरू केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामांचे लोकार्पण केले आहे. परंतु यानंतरही ठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूककोंडी अद्याप संपलेली नाही. सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी पुन्हा चक्काजामची स्थिती होवू लागली आहे. घणसोली ते तळवली उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर रबाळे रेल्वे स्टेशन ते पोलीस चौकीजवळ रोड अरूंद असल्याने वाहतूककोंडी होवू लागली आहे. गुरूवारी रात्री नवीन पुलावरही चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती. ऐरोली कटई मार्गाचे काम होईपर्यंत या मार्गावरील कोंडी थांबणार नाही.ठाणे-बेलापूर रोडवर सर्वात गंभीर स्थिती तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर आहे. एमआयडीसीमध्ये जाणारे १ लाख पेक्षा जास्त कामगार व परिसरातील नागरिक या स्टेशनमधून ये-जा करत असतात. या सर्वांना रोड ओलांडून एमआयडीसीमध्ये व तुभे स्टोअर्स व नाक्याकडे जावे लागत आहे. यामुळे याठिकाणी २४ तास वाहतूककोंडी होत असते.सकाळी व सायंकाळी वाहतूक जवळपास ठप्प होते. रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता वाढू लागली आहे. सीबीडी ते ऐरोली दरम्यान महामार्ग व ठाणे- बेलापूर रोडवर भुयारी मार्ग व स्काय वॉकचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. १२ उड्डाणपूल, एक भुयारी मार्ग, तीन स्कायवॉक तयार केले आहेत. परंतु महामार्गावरील अनधिकृत बसथांबे, तुर्भे नाक्यावरील अतिक्रमण, तुर्भे स्टोअर्ससमोर उड्डाणपूल नसल्यामुळे वाहतूककोंडी होवू लागली आहे.याविषयी आताच ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात पुन्हा वाहतूक समस्या गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.१२ उड्डाणपुलांचे जाळेसीबीडी ते ऐरोली दरम्यान महामार्गासह ठाणे-बेलापूर रोडवर तब्बल १२ उड्डाणपुलांचे जाळे आहे. सीबीडी, उरण फाटा, नेरूळ, शिरवणे, सानपाडा, तुर्भे, पावणे, सविता केमिकल, कोपरखैरणे रेल्वे स्टेशन, घणसोली रेल्वे स्टेशन, तळवली,रबाळे पोलीस स्टेशन असे एकूण १२ उड्डाणपूल या मार्गावर उभारण्यात आले असून अजून तुर्भे रेल्वे स्टेशनसमोरही उड्डाणपुलाची गरज आहे.स्कायवॉकसह भुयारी मार्गया मार्गावर सानपाडा, तुर्भे नाका,कोपरखैरणे, खैरणे, रबाळे रेल्वे स्टेशन, चिंचपाडा जवळ स्काय वॉक उभारण्यात आला असून लोकमत प्रेसजवळ भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी