शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कोपरा पुलाजवळील वाहतूककोंडी फुटणार

By admin | Updated: June 2, 2017 06:03 IST

खारघर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोपरा पुलावरील वाहतूककोंडी थांबणार असून सायन- पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोपरा पुलावरील वाहतूककोंडी थांबणार असून सायन- पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरु वात झाल्याने याठिकाणाहून ये-जा करणाऱ्या हजारो वाहन चालकांनी यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे . विशेष म्हणजे या पुलावर सकाळ, सायंकाळी सुमारे ३० मिनिटापेक्षा जास्त वेळ वाहतूककोंडी होत होती. यासंदर्भात खारघर जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरु नाथ गायकर यांनी सिडकोकडे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाची मागणी केली होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील यासंदर्भात सिडकोकडे पत्रव्यवहार करून या रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. खारघर शहरात जाण्यासाठी दोन मार्गिका आहेत. कोपरा गावाजवळील उड्डाणपूल व हिरानंदानी उड्डाणपुलाखालून खारघर शहरात प्रवेश करता येतो. सायन- पनवेल महामार्गावरून खारघर शहरात प्रवेश करताना हा मार्ग अनेक वर्षांपासून वाहनचालकांची वहिवाट बनला असल्याने दररोज हजारो वाहने याठिकाणाहून ये-जा करत असतात. शहराचा झपाट्याने विकास झाल्याने वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोपरा पुलावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी सिडकोने या पुलाला समांतर असा तात्पुरत्या स्वरूपाचा पूल बांधला. मात्र तरी देखील वाहतूककोंडी सुटत नसल्याने सिडकोने सायन-पनवेल महामार्गाला पनवेलच्या जाणाऱ्या मार्गावर डांबरी रस्त्याच्या कामाला सुरु वात केली आहे. यामुळे कोपरा उडाणपुलाजवळ होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा निर्माण न होता थेट पनवेलच्या दिशेने जाता येणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर सिडकोने या रस्त्याच्या कामाला सुरु वात केल्याने नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे . कोपरा पुलावरील वाहतूककोंडी ही याठिकाणच्या महत्त्वाची समस्या बनली होती. नागरिकांच्या तक्र ारी देखील आमच्याकडे आल्या होत्या. याठिकाणची वाहतूककोंडी समस्या सोडविण्यासाठी आम्ही तत्काळ या ठिकाणच्या रस्त्याच्या कामाला सुरु वात केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून लवकरच हा मार्ग वाहतुकीस खुला केला जाईल.- सीताराम रोकडे, प्रशासक, खारघर सिडको.मनपाच्या उदासीनतेचा फटका खारघर शहरातील या प्रवेशद्वाराची वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिडकोच्या वतीने याठिकाणी मोठ्या पुलाच्या कामाला देखील सुरुवात के ली आहे. मात्र, नवी मुंबई महानगर पालिकेला पाणीपुरवठा करणारी मोरबे धरणाची जलवाहिनी या पुलाच्या आड आल्याने मागील दोन वर्षे या पुलाचे काम रखडले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत जोपर्यंत या जलवाहिनीला या ठिकाणी हलविण्यासाठी प्रयत्न केले जात नाही, तोपर्यंत या पुलाचे काम असेच रेंगाळत राहणार आहे.