शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सहआयुक्तांसह तीन उपआयुक्तांच्या बदल्या

By admin | Updated: April 29, 2017 01:45 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नवी मुंबईच्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नवी मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नवी मुंबईच्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात एक सहआयुक्त, तर तीन उपआयुक्त दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांच्याजागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यापुढे शहरातील गुन्हेगारी नियंत्रित राहण्याचे मोठे आव्हान असणार आहे.राज्य सरकारने पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी रात्री जाहीर केले. त्यात भारतीय व राज्य सेवेतील विशेष महानिरीक्षक तसेच अधीक्षक दर्जाच्या एकूण १३७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदली झालेल्या या अधिकाऱ्यांमध्ये नवी मुंबईचे सहआयुक्त मधुकर पाण्डेय यांच्यासह चार उपआयुक्तांचा समावेश आहे. गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ-एक उपआयुक्त प्रशांत खैरे व राज्य राखीव पोलीस बल गट ११चे उपआयुक्त राजीव जैन यांचा समावेश आहे. सहआयुक्त मधुकर पाण्डेय हे दहा महिन्यांपूर्वी नवी मुंबई आयुक्तालयात रुजू झाले होते. यापूर्वी अप्पर पोलीस आयुक्तपदाचा दर्जा त्यांच्या नियुक्ती वेळी सहआयुक्त असा करण्यात आला होता; परंतु सह आयुक्त पदावर नियुक्ती होऊनही तसे अधिकार मिळत नव्हते, अशी चर्चा आहे. यामुळे त्यांनी स्वत:हून बदलीसाठी प्रयत्न चालवले होते, अशीही चर्चा पोलिसांमध्ये आहे. अखेर त्यांची ठाणे शहर येथे सह आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंबई राज्य गुप्तवार्ताचे सह आयुक्त संतोष रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.मागील काही वर्षांपासून नवी मुंबईतली गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे काम उपआयुक्त दिलीप सावंत यांनी गुन्हे शाखेच्या माध्यमातून केले आहे. अमली पदार्थविक्रेते यांच्यासह आर्थिक फसवणुकीच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करून सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पथकांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. यामुळे नियंत्रणात असलेली गुन्हेगारी कायम ठेवण्याचे तसेच केलेल्या कारवायांचा तपास पुढे सुरू ठेवण्याचे आव्हान गुन्हे शाखेच्या नव्या उपआयुक्तांपुढे असणार आहे. तर परिमंडळ उपआयुक्त प्रशांत खैरे यांनीही त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांवर कायद्याचा दबदबा निर्माण करण्याचे काम केले आहे. या दोन्ही उपआयुक्तांच्या बदलीमुळे आयुक्तालयातील रिक्त झालेल्या दोन जागांकरिता कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आर. आर. बनसोडे व मुंबईचे उपआयुक्त प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.