शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील सहा अभियंत्यांची खांदेपालट

By योगेश पिंगळे | Updated: May 16, 2023 16:41 IST

एकाच विभागात मागील काही वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या स्थापत्य आणि पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही अभियंत्यांवर अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेच्या स्थापत्य आणि पाणीपुरवठा विभागातील सुमारे सहा अभियंत्यांची खांदेपालट करण्यात आली असून काही अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सेवेच्या हितार्थ महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बदल्या केल्या असून संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

एकाच विभागात मागील काही वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या स्थापत्य आणि पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही अभियंत्यांवर अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता संजय खताळ यांची महापालिका मुख्यालयातून कोपरखैरणे विभागात बदली करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता विजय राऊत यांच्याकडे पर्यावरण व क्षेपणभूमीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. नगररचना विभागातील उपअभियंता गजानन पुरी यांची बदली सार्वजनिक बांधकाम विभाग (मुख्यालय) येथे करण्यात आली आहे. बेलापूर विभागातील पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपक नगराळे यांची बदली करून त्यांच्याकडे ठाणे बेलापूर रस्त्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून नेरुळ पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश लगदिवे यांच्याकडे बेलापूर विभागाच्या पाणीपुरवठ्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

शाखा अभियंता सुभाष तुंगार यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणाहून बदली करून त्यांच्याकडे ठाणे बेलापूर रस्त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर व्हावे व पदभार स्वीकारल्याचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई