शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

ऐरोलीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:14 IST

ठाणे-वाशी रेल्वेमार्गावरील प्रस्तावित दिघा स्थानकालगत शनिवारी दुपारी रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे तीन तास दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी, ठाणे ते वाशी, नेरूळ मार्गावरील रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

नवी मुंबई : ठाणे-वाशी रेल्वेमार्गावरील प्रस्तावित दिघा स्थानकालगत शनिवारी दुपारी रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे तीन तास दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी, ठाणे ते वाशी, नेरूळ मार्गावरील रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तर अनेक प्रवाशांनी पर्यायी वाहतूक मार्गाने आपले इच्छीतस्थळ गाठले.शनिवारी दुपारी ऐरोली स्थानकातून निघालेली लोकल प्रस्तावित दिघा स्थानकालगत आली असता, त्या ठिकाणी रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याचे निदर्शनास आले. यामुळे या लोकलसह त्यामागून ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच लोकल थांबविण्यात आल्या होत्या. परंतु यापूर्वीही त्या ठिकाणी ओव्हरहेड वायर तुटल्याचा प्रकार घडलेला होता. त्यामुळे दुरुस्ती कामाचा कालावधी वाढल्याने ठाणे-वाशी, नेरूळ मार्गावरील दुतर्फा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांना अर्ध्या प्रवासातून पायपीट करावी लागली. रेल्वेचा खोळंबा लक्षात घेऊन एनएमएमटीने ठाणे-बेलापूर मार्गावर जादा बस सोडून त्यांच्या फेºया वाढवल्या होत्या, त्यामुळे बहुतांश प्रवाशांना प्रवासाचा निश्चित टप्पा गाठता आल्याने त्यांना दिलासा मिळाला.अखेर दुपारी अडीचनंतर दुरुस्तीकाम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल