शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना सौरऊर्जा वापराचे प्रशिक्षण, आयआयटी बॉम्बेचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:31 IST

गेल्या काही वर्षांत सौरऊर्जेचा वापर काही प्रमाणात वाढला आहे, पण नवीन पिढीला शालेय जीवनापासून सौरऊर्जेविषयी माहिती आणि ऊर्जा वापरण्याचे प्रशिक्षण दिल्यास, भविष्यात याचा नक्कीच फायदा होणार आहे.

नवी मुंबई : गेल्या काही वर्षांत सौरऊर्जेचा वापर काही प्रमाणात वाढला आहे, पण नवीन पिढीला शालेय जीवनापासून सौरऊर्जेविषयी माहिती आणि ऊर्जा वापरण्याचे प्रशिक्षण दिल्यास, भविष्यात याचा नक्कीच फायदा होणार आहे. हे लक्षात घेऊन आयआयटी बॉम्बेने ‘सोलर ऊर्जा थ्रू लोकलायझेशन फॉर सस्टेंनॅब्लिटी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत रायगड येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ४०० विद्यार्थ्यांना सौरऊर्जा वापराचे प्रशिक्षण दिले आहे.देशातील ग्रामीण भागात अजूनही लोडशेडिंग आहे. विजेची तूट असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अनेकदा व्यत्यय येतो. त्यामुळे आयआयटी बॉम्बेने सौरऊर्जेवर चालणारे दिवे तयार केले आहेत. ग्रामीण भागात या दिव्यांद्वारे सौरऊर्जेविषयी जनजागृती करून त्याचा वापर वाढावा, म्हणून आयआयटी बॉम्बेने उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी आणि सातवीच्या ४०० विद्यार्थ्यांना सौरऊर्जेविषयी प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये पारंपरिक वापरात येणारी वीज आणि सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज याविषयी माहिती देण्यात आली, तसेच सौरऊर्जेचे फायदे, उपयोग, तांत्रिक माहिती, सौर उपकरणांचा वापर याविषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.सौरदिवे लावून दिल्यावर त्याची देखभालही महत्त्वाची आहे. त्यामुळे या दिव्यांची देखभाल करण्यासाठी सौरऊर्जेची प्रयोगशाळादेखील गावांमध्ये उभी करण्यात येणार असल्याचेही आयआयटीतर्फे स्पष्ट करण्यात आले. या प्रयोगशाळांमध्ये नवीन संशोधन करण्यासाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे मत, एनर्जी सायन्स विभागाचे प्रा. चेतन सोलंकी यांनी सांगितले.