शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धूलिवंदनामुळे महामार्गावरील वाहतूकही रोडावली; वाहतूक बंद असल्याचे हवा गुणवत्तेत वाढ

By नामदेव मोरे | Updated: March 25, 2024 16:33 IST

​​​​​​​होळी व धूलिवंदनमुळे शनिवार ते सोमवार तीन दिवस सुट्टी असल्यामुळे हजारो चाकरमानी शुक्रवारपासूनच गावाकडे रवाना झाले आहेत. सलग सुट्यांमुळे पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्याही मोठी होती.

नवी मुंबई : धूूलिवंदनला पहाटेपासून सुरू झालेल्या रंगोत्सवामुळे शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. सर्वच नागरिक सुट्टीचा आनंद घेत असल्यामुळे सायन - पनवेल महामार्गासह सर्व प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक रोडावली होती. प्रमुख रस्त्यांवरही तुरळक प्रमाणात वाहतूक दिसत होती.होळी व धूलिवंदनमुळे शनिवार ते सोमवार तीन दिवस सुट्टी असल्यामुळे हजारो चाकरमानी शुक्रवारपासूनच गावाकडे रवाना झाले आहेत. सलग सुट्यांमुळे पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्याही मोठी होती. सोमवारी मुंबई, नवी मुंबई परिसरातील बहुतांश सर्व कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पहाटेपासून सर्वच नागरिक रंगोत्सवाचा आनंद घेत असल्यामुळे शहरातील इतर सर्व बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर स्पष्टपणे दिसत होता. सायन - पनवेल महामार्ग, ठाणे - बेलापूर रोड, पाम बीच रोड, पनवेल - उरण, पनवेल - गोवा या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक रोडावली होती. सायन - पनवेल महामार्गावर दुपारी अत्यंक कमी वाहने पाहावयास मिळाली. अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कमी होती.

रोडवरील वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणही कमी झाले होते. सर्वच विभागांतील हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये सुधारणा झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. नागरिकांना प्रदूषणविरहित श्वास घेणे शक्य झाले होते.

शहरातील विभागनिहाय हवा गुणवत्ता निर्देशांक

विभाग - निर्देशांकवाशी १३०

महापे १०२नेरूळ १०९

कळंबोली ८९तळोजा ११५