कर्जत : नेरळ येथे प्रचंड नागरीकरणामुळे रस्ते आता अपुरे पडत आहेत. नेरळमधील अरु ंद रस्ते ही अडचणीची बाब ठरत आहे. या अरु ंद रस्त्यावर विविध वस्तू विक्र ेत्यांनी अतिक्र मण केल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. एकेरी मार्गाची कठोरपणे अंमलबजावणी आणि रस्त्यावरील असलेली अतिक्रमणे यावर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.नेरळ हे रायगड जिल्ह्यातील शहरीकरण झपाट्याने झालेले गाव आहे. वीस हजारांच्या घरात लोकवस्ती असलेल्या या गावामध्ये ग्रामपंचायत कारभार करीत आहे. ग्रामपंचायत असून देखील परिसरातील ५० गावे वाड्यांतील नागरिक बाजारहाटासाठी नेरळ येथेच येतात. या बाजारपेठेत रस्त्यावर अनेक विक्रेत्यांनी अतिक्र मण केले आहे. त्या समस्येबरोबर येथील रस्त्यांची आणखी एक मोठी समस्या म्हणजे रस्त्यावर बांधकामे करून केलेले अतिक्र मण ही आजची नाही तर ३० -३५ वर्षांपासूनची समस्या आहे. ती समस्या प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील नेरळ -माथेरान रस्त्यावरील आहे. हा रस्ता खांडा पूल येथून सुरु होतो आणि जकात नाक्यापर्यंत भागात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्र मण आहे. याच रस्त्यावरून सर्वांची वहिवाट असल्याने येथील वाहतुकीची समस्या सर्वांना त्रासदायक ठरत आहे. सर्वाधिक अडथळे येतात ते रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या दुचाकीमुळे, तसेच काही वेळा तेथे एखादी मोठी गाडी उभी असेल तर वाट काढणे अत्यंत कठीण होते. नेरळ ग्रामपंचायतीने नियोजन करून हा बुधवारचा आठवडी बाजार दोन महिन्यांपासून जुनी बाजारपेठेत शिवाजी महाराज चौकपासून डॉ. लाड यांचा दवाखाना या भागात हलविला, त्यामुळे पूर्वी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. नेरळमध्ये येणारे लोक हे प्रामुख्याने पूर्व भागातून येत असतात, त्यामुळे रेल्वेगेटपासून अंबिकानाका आणि मिनीट्रेन गेटपासून लोकमान्य टिळक चौक तसेच वाचनालयापासून नेरळ ग्रामपंचायत हे तीन रस्ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. कारण माथेरान-नेरळ रस्त्याने आल्यानंतर नेरळ रेल्वे गेट येथे जाण्यासाठी अंबिका नाका येथून पुढे जावे लागते. मात्र अनेक वाहने टिळक चौकातून नो एंट्रीमध्ये घुसतात आणि वाहतूक कोंडी करून ठेवतात, कारण त्या रस्त्याने केवळ कल्याण-कर्जत रस्त्याकडे जाण्याची परवानगी आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने प्रामुख्याने सर्व बँकांच्या समोर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक समस्येकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
नेरळमध्ये वाहतूक कोंडी
By admin | Updated: October 26, 2015 00:55 IST