शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत नियम धाब्यावर बसवून व्यापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:51 IST

भाजी मार्केटमधील प्रकार; परवाना नसलेले बनले व्यापारी

- नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये नियम धाब्यावर बसवून व्यापार सुरू आहे. ‘डी’ विंगमध्ये ५०० पेक्षा जास्त व्यापारी किरकोळ विक्री करत असून, त्यामधील बहुतांश जणांकडे परवानाच नाही. परवाना नसतानाही मार्केटमध्ये बिनधास्तपणे व्यापार करणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी घाऊक बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट असा कागदावर उल्लेख असला, तरी प्रत्यक्षात तेथील स्थिती अत्यंत बिकट आहे. नियम धाब्यावर बसवून कामकाज केले जात असून, त्यामध्ये भाजी मार्केटमधील किरकोळ विक्रीचाही समावेश आहे. येथील ‘डी’ विंगमधील अपवाद वगळता प्रत्येक गाळ्यात किरकोळ (सेमी होलसेलर) विक्री करणाºयांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विक्रेत्यांचा कोणताही तपशील प्रशासनाकडे उपलब्ध नाही. ५०० पेक्षा जास्त व्यापारी असल्याचा अंदाज काही कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे. नियमाप्रमाणे मार्केटच्या आवारामध्ये काम करणाºया प्रत्येकाकडे परवाना असणे आवश्यक आहे. माथाडी कामगारांपासून अडत्यांपर्यंत सर्वांना हा नियम लागू आहे; परंतु ‘डी’ विंगमध्ये व्यापार करणाºया अनेकांकडे कोणताच परवाना नाही. मार्केटमधील गाळेधारकांना नियमाप्रमाणे त्यांचे गाळे भाडेतत्त्वावर देता येत नाहीत; परंतु यानंतरही ‘डी’ विंगमध्ये किरकोळ विक्रेते व्यापार कसा करत आहेत. त्यांना गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या विषयी प्रशासनाला माहिती विचारली असता, एकही गाळा अधिकृतपणे भाडेतत्त्वावर दिल्याची नोंद उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. किरकोळ विक्री करण्याची परवानगीही कोणालाच देण्यात आलेली नाही.भाजी मार्केटमध्ये विनापरवाना व्यापार करणाºयांना नक्की कोणी अभय दिले आहे, हा विषय चर्चेचा बनला आहे. या विक्रेत्यांची कोणाकडेच अधिकृत नोंद नसल्यामुळे भविष्यात कोणी चुकीचे काम केले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. भाजी मार्केटचे कामकाज मध्यरात्री सुरू होते व दुपारी १ वाजण्यापूर्वी बहुतांश व्यवहार संपलेले असतात; पण ‘डी’ विंगमध्ये दिवसभर व्यापार सुरू असतो. दोन्ही गाळ्यांच्या मध्ये कामगार व ग्राहकांना ये-जा करण्यासाठी असलेल्या जागेवरही अतिक्रमण करण्यात आले आहे. दिवसभर गाळ्यांमध्ये व्यापार सुरू असल्यामुळे येथील साफसफाईही करता येत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मार्केटमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून, प्रशासन काहीही ठोस कारवाई करत नाही. वास्तविक ज्यांच्याकडे परवाना नाही त्यांच्यावर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे; पण प्रशासनच संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या विषयी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पणनमंत्र्यांसह पणन संचालकांकडे तक्रार करून नियमबाह्य काम करणाºयांवर कारवाईची मागणी केली आहे.न्यायालयाच्या निर्णयाचाही अवमानभाजी मार्केटमधील किरकोळ व्यापाराविरोधात यापूर्वी मॅफ्को मार्केटमधील व्यापाºयांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अनधिकृत किरकोळ व्यापारामुळे मॅफ्कोमधील व्यापारावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. न्यायालयानेही या व्यापारावर बंदी घातली आहे; परंतु न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून सुरू असलेल्या अनधिकृत व्यापाराविषयी प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही.एकही परवाना दिलेला नाहीभाजी मार्केटच्या ‘डी’ विंगमध्ये इतर विंगमधील काही परवानाधारक व्यापारीही व्यवसाय करत आहेत; परंतु नियमाप्रमाणे ज्यांना जिथे गाळा दिला तेथेच व्यापार करणे आवश्यक आहे. सेमी होलसेल व किरकोळ विक्रीसाठी किती व्यापाºयांना परवाने दिले आहेत, याविषयी माहिती घेण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधला असता, अशाप्रकारे कोणालाही परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले.बाजार समितीचा परवाना असलेल्यांनाच मार्केट आवारामध्ये प्रत्यक्ष व्यापार करता येतो. जर परवाना नसतानाही कोणी व्यापार करत असतील तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाते. भाजी मार्केटमध्येही कोणी विनापरवाना व्यापार करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.- अनिल चव्हाण, सचिव, बाजार समिती

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई