शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड तालुक्यात पर्यटकांची अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:03 IST

समुद्रकिनारे फुलले : जंजिरा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी; हॉटेल, लॉजिंग हाउसफुल्ल

- संजय करडे

मुरुड : शनिवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी व आलेला रविवार साधून हजारो पर्यटक मुरुड व काशिद समुद्रकिनारी येऊन धडकले आहेत. शनिवारपासूनच पर्यटकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पर्यटक स्वत:च्या चारचाकी गाड्या घेऊन येणे अधिक पसंत केले होते. मुरुडसह काशिद समुद्रकिनारासुद्धा शेकडो पर्यटकांनी फुलून गेला होता. पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने मासळी मार्केट येथून जंजिरा किल्ल्याकडे जाणाºया मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. राजपुरी जेट्टी, खोरा बंदर जेट्टी येथील वाहनतळ हाउसफुल्ल होऊनरस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने पार्क करण्यात आली होती. राजपुरी येथील अरुंद रस्ता असल्याने एखादे मोठे वाहन आल्यास वाहतूककोंडी होत असल्याचे निदर्शनास आले.

मुंबईपासून अवघ्या १५० किलोमीटरवर मुरुड हे पर्यटनस्थळ असल्याने येथे ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली आदी भागातील पर्यटक त्याचप्रमाणे औरंगाबाद, पुणे, बीडचे पर्यटक मोठ्या संख्येने ऐतिहासिक जंजिरा किल्ला व समुद्रकिनारा पाहावयास आले होते.मुरुड तालुक्याचे सध्याचे तापमान ३६ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असूनसुद्धा पर्यटकांनी या ठिकाणी येणे अधिक पसंत केले आहे. येथे येणाºया पर्यटकांनी समुद्रस्नान, बनाना रायडिंग, पॅरासिलिंग तसेच काही पर्यटक घोडेस्वारी, उंटस्वारीचाही आनंद लुटत होते. शनिवार व रविवारच्या या सुट्टीत पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे आल्याने सर्व हॉटेल, लॉजिंग हाउसफुल्ल होत्या. स्टॉल व दुकानावर पर्यटकांची गर्दी दिसून येत होती.पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष केंद्रित -बारापत्रेच्पर्यटकांच्या संख्येबाबत बोलताना महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुरुडचे बंदर निरीक्षक हितेंद्र बारापत्रे म्हणाले की, सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी दिघी, राजपुरी,व खोरा बंदर या तीन ठिकाणावरून पर्यटक मोठ्या संख्येने किल्ल्यावर येत आहेत.

जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने पर्यटक आल्याने किल्ल्यात प्रवेश करताना थोडा वेळ त्यांना बोटीत थांबावे लागत होते. शिडांच्या बोटीत लाइफ जॅकेट ठेवण्याची सक्ती करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाची काळजी घेण्याच्या सूचना बोटमालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच उत्कृष्ट पोहणारेसुद्धा तैनात करण्यात आले असून प्रवाशांची काळजी घेण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे या वेळी बारापत्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

किल्ल्यावर आज मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली आहे. पर्यटकांना किल्ल्यावर जाताना थांबावे लागत आहे. वाºयाचा वेग जास्त असल्याने लाटा थडकल्या जात आहेत. त्यामुळे होडीतून उतरताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही पर्यटक किल्ल्याला फेरा मारून किनाºयाकडे फिरकत आहेत.- नाझ कादरी, व्यवस्थापक, जंजिरा जलवाहतूक