शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावे संघर्ष समितीची आज निर्वाणीची सभा

By admin | Updated: February 1, 2016 01:22 IST

महापालिकेत निवडून आलेले भाजपाचे नगरसेवक आता स्वतंत्र नगरपालिका स्थापन होवू नये याकरिता प्रयत्न करित असल्याने २७ गावांच्या सर्वपक्षीय हक्क

अरविंद म्हात्रे ,  चिकणघरमहापालिकेत निवडून आलेले भाजपाचे नगरसेवक आता स्वतंत्र नगरपालिका स्थापन होवू नये याकरिता प्रयत्न करित असल्याने २७ गावांच्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची आज (सोमवारी) होणारी सभा गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. या सभेत भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांना पाचारण करण्यात आले असून ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, याकरिता संघर्ष समिती विविध मार्गांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना भाजपाच्या नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. किमान अडीच वर्षे तरी नगरसेवकपदी राहू द्यावे, अशी गळ घातल्याची माहिती संघर्ष समितीला मिळाली. त्यामुळे सोमवारच्या सभेत नगरसेवकपदाचा मोह लागलेल्यांची कसोटी लागणार आहे. १ जून २०१५ च्या अधिसूचनेनुसार २७ गावांचा केडीएमसीत समावेश झाल्याला आठ महिने उलटून गेल्यानंतरही येथे रस्ते, पायवाटा, पिण्याचे पाणी या समस्या जैसे थे असल्याचे चित्र आहे. दरम्यान, २० आॅक्टोबरच्या जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,’ असे आश्वासन गावकऱ्यांना दिले होते. याचीच री प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही सोनारपाडा येथील संघर्ष समितीच्या प्रचारसभेत ओढली होती. प्रत्यक्षात मात्र अद्याप काहीही हालचाल दिसत नसल्याने ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या नेत्यांना धारेवर धरले असल्याने संघर्ष समितीने आता आक्र मक पवित्रा घेतला आहे. ं‘मुख्यमंत्र्यांवर आमचा आजही विश्वास आहे. सात नगरसेवक जरी भाजपाचे असले तरी त्यांना समितीच्या बरोबर राहावे लागणार आहे. त्यांचे नगरसेवक पद औटघटकेचे असेल, याची आधीच कल्पना आहे. त्यामुळे समिती आणि भाजपा एकत्रितपणे आहेत.’-चंद्रकांत पाटील, सरचिटणीस, २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती‘भारतीय जनता पक्ष २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आहे आणि यापुढेही राहील. २७ गावांबाबतीत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला जाईल.’ -आमदार नरेंद्र पवार, कल्याण (प.)