शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आज ‘कशी असावी महानगरपालिके’वर चर्चा

By admin | Updated: June 11, 2016 02:38 IST

सध्या शहरात होऊ घातलेल्या पनवेल महापालिकेबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

पनवेल : सध्या शहरात होऊ घातलेल्या पनवेल महापालिकेबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. या महापालिकेबाबत नागरिकांना काय वाटते, भविष्यात पनवेलकरांसाठी ही महापालिका कितपत प्रभावी ठरणार, यावर चर्चा घडवून आणण्यासाठी शनिवार सकाळी १0.३0 वाजता कळंबोली येथील केएलई कॉलेजमध्ये विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल तालुक्यातील मंडळींनी जास्तीत जास्त संख्येने या चर्चासत्रामध्ये उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सिटीझन युनिटी फोरम (कफ) व केएलई संस्थेचे विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कळंबोली यांनी पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक लोकमत आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रातील मंडळींसाठी हे व्यासपीठ खुले आहे. ‘कशी असावी महानगरपालिका’ हा चर्चेचा विषय असून आपली मते, सूचना मांडण्याची संधी सर्वांना या कार्यक्र माद्वारे मिळणार आहे. आजी- माजी सनदी अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मातब्बर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली मते मांडणार आहेत. नुकत्याच जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, पनवेल महानगरपालिकेत सिडकोचे सात नोड, नैना क्षेत्रातील गावे आणि नवी मुंंबई एसईझेड क्षेत्र आणि सिडको क्षेत्रातील २१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. महानगरपालिकेची अधिसूचना निघाल्यानंतर पालिकेत समाविष्ट ग्रामीण, शहरी भाग, येथील विकास, होऊ घातलेले प्रकल्प याबाबत चर्चा होत आहे. महापालिका झाल्यावर नागरिकांना होणारे फायदे, दळणवळणाच्या वाढणाऱ्या सोयी-सुविधा, आकारण्यात येणारे कर आदींवर कार्यक्रमात चर्चा होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल महानगरपालिकेला वेगळे स्वरूप प्राप्त होणार आहे. चर्चासत्रासाठी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, नगरविकास खात्याचे अप्पर सचिव अमित कवडे, शिवसेना उपनेते माजी सनदी अधिकारी विजय नहाटा, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार शेकाप विवेक पाटील, पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील, शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण, शेकापचे बाळाराम पाटील, आरपीआयचे जगदीश गायकवाड, काँग्रेसचे महेंद्र घरत, राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे आदींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.