शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

घरमालकांवर भाडेकरू शोधण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:39 IST

पनवेलमध्ये मोठ्या संख्येने घरे रिकामीच

वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग :  कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे कामगार गावी स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे पनवेल पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात घरे आणि खोल्या रिकाम्या झाल्यामुळे घरमालकांवर भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे. विशेषतः ग्रामीण भागात याचा मोठा फटका बसला आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील अनेक व्यक्तींनी गुंतवणूक म्हणून खारघरसारख्या मोठ्या शहरात घरे घेऊन ठेवली आहेत. चार लाखांहून अधिक लोकवस्ती असलेल्या खारघर शहर आणि गावात अंदाजे पन्नास हजारांहून अधिक भाडेकरू वास्तव्यास आहेत. तर परिसरातील खारघर, कोपरा, बेलपाडा, मुर्बी, पेठ, ओवे आदी गावांतील प्रकल्पग्रस्तांचा रोजगार गेल्यामुळे खोली भाड्याने देऊन उदरनिर्वाह करीत आहेत. टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेल्यामुळे कामगार गावी स्थलांतरित झाले. त्यामुळे खारघर परिसरात खोल्या रिकाम्या आहेत.

रिकाम्या घरांची देखभाल आणि वीजबिल घरमालकाला येत असल्यामुळे घरमालक, इस्टेट एजंट तसेच ओळखीच्या व्यक्तीकडे हजार, दोन हजार रुपये भाडे कमी असेल तरी चालेल, मात्र भाडेकरू शोधून घर भाड्याने द्यावे, अशी मागणी करीत आहेत. खारघर पोलीस ठाण्यात विचारणा केली असता. दरवर्षी पाच हजारांहून अधिक भाडेकरूंची नोंद पोलीस ठाण्यात होते. अनेक भाडेकरू भाडेकराराची मुदत संपल्यावर परस्पर मुदत वाढवून घेतात. मात्र गेल्या सहा महिन्यांत खूप कमी भाडेकरार केल्याचे दिसून येते.

खारघर परिसरातील गावात ग्रामस्थाने बांधकाम केलेल्या खोलीमध्ये घरकाम, मजूर, रंगकाम, सुतार, गवंडी तसेच छोट्यामोठ्या पगारावर काम करणारे भाडेकरू राहत असत. मागील मार्च महिन्यापासून रोजगार गेल्यामुळे अनेक ग्रामस्थांनी भाडेकरूंचे घरभाडे माफ केले. अजूनही  काम सुरू झाले नाही. त्यामुळे स्थलांतर झालेले कामगार फिरकले नाहीत.     - अभिमन्यू तोडेकर, ग्रामस्थ