शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आयकर, उत्पादन शुल्क विभागांची भरारी पथके

By admin | Updated: May 2, 2017 03:35 IST

पनवेल महापालिका निवडणूक अतिशय संवेदनशील होणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श

वैभव गायकर / पनवेलपनवेल महापालिका निवडणूक अतिशय संवेदनशील होणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्यासाठी आयकर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागांची पथके महापालिका क्षेत्रात दाखल झाली आहेत.येत्या २४ मे रोजी पनवेल महापालिकेच्या २० प्रभागांतून ७८ जागांसाठी निवडणूक होत आहे. राजकीय नेते आचारसंहितेचे उल्लंघन करून मतदारांना विकत घेण्याचा मार्ग अवलंबण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे पुराव्यानिशी प्राप्त झाली आहे. यापूर्वी असे प्रकार घडले आहेत. अनेक कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले गेले होते. पनवेल महापालिका क्षेत्रात आयकर खात्याचे अधिकारी त्यांच्या पथकासह दाखल झाले आहेत. ते त्यांच्या पद्धतीने माहिती घेत आहेत. काही गृहनिर्माण सोसायटीमध्ये त्यांनी सापळे रचले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने गृहनिर्माण सोसायटीतील मतदारांच्या संपर्कात राहून तेथील हालचालींवर आयकर खात्याने लक्ष केंद्रित केले आहे. काही बँक खात्यांवर होणाऱ्या मोठ्या रकमेच्या उलाढालींची माहिती आयकर खाते घेत असल्याचे सांगितले. राज्य उत्पादन शुल्क खात्याने पनवेल आणि परिसरातील दारूविक्र ी दुकाने, बार, धाब्यावरील दररोज होणाऱ्या विक्र ीची तपशीलवार माहिती घेणे सुरू केले आहे. धाबे, हॉटेल आणि फार्म हाउसवर होणाऱ्या ओल्या पार्टीवर नजर ठेवली आहे. आयकर खाते, राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांच्या निवडणुकीसंदर्भातील कार्यवाहीचा अहवाल दररोज राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येत आहे.पनवेलमधील एका सामाजिक संस्थेने राज्य निवडणूक अयोगाकडे तक्रार करून आदर्श आचारसंहिता राबविण्याची जोरदार मागणी केली होती. निवडणुकीत अवैध मार्गाने होत असलेली जबरदस्ती आणि पैसेवाटप किंवा मतदार खरेदी, गुंडागर्दी करून दहशत माजवणे आदी प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आयोगाने मोठी व्यूहरचना आखली आहे. पोलिसांनी त्यांच्या गस्ती वाढविल्या आहेत. गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधक करवाई करण्यास सुरु वात केली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने गृहनिर्माण सोसायटीतील मतदारांच्या संपर्कात राहून तेथील हालचालींवर आयकर खात्याने लक्ष केंद्रित केले आहे. काही बँक खात्यांवर होणाऱ्या मोठ्या रकमेच्या उलाढालींची माहिती आयकर खाते घेत आहे.