शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ज्वेलर्स लुटणाऱ्या टोळीच्या तिघांना अटक

By admin | Updated: June 17, 2017 02:14 IST

भिंतीला भगदाड पाडून दारावे येथील मयूरा ज्वेलर्समधील ५० लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. या गुन्ह्याची उकल करून नेरुळ पोलिसांनी सराईत टोळीच्या तिघांना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : भिंतीला भगदाड पाडून दारावे येथील मयूरा ज्वेलर्समधील ५० लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. या गुन्ह्याची उकल करून नेरुळ पोलिसांनी सराईत टोळीच्या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, सापडलेल्या रेल्वेच्या तिकिटावरून पोलिसांनी या टोळीचा शोध घेतला आहे.दारावे येथील मयूरा ज्वेलर्सची भिंत फोडून ५० लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. ज्वेलर्सच्या मागच्या बाजूला चाळीमध्ये भाडोत्री घर घेवून चोरट्यांनी दुसऱ्याच दिवशी त्याठिकाणी घरफोडी केली होती. सदर गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर नेरुळ पोलिसांनी एक महिन्याच्या तपासाअंती तिघांना अटक केली आहे. अटक केलेले तिघेही झारखंडचे असून देशभर त्यांच्या टोळीने गुन्हे केले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेल्या ऐवजापैकी सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याचे सह आयुक्त प्रशांत बुरडे यांनी सांगितले. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांकडून ज्वेलर्सची तसेच गुन्ह्यासाठी भाड्याने घेण्यात आलेल्या घराची पाहणी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांच्या हाती रेल्वेचे तिकीट लागले होते. सानपाडा ते सीवूड दरम्यानच्या प्रवासाचे हे तिकीट होते. यावरून पोलिसांनी सानपाडा रेल्वेस्थानकातील त्या दिवशीचे सीसीटीव्ही तपासले व घटना घडली तेव्हाचे सीवूड स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. यावेळी ७ ते ८ संशयितांची माहिती नेरुळ पोलिसांच्या हाती लागली. यावरून उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भगुजी औटी, सहायक निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड, राजेश गज्जल यांचे तपास पथक तयार करण्यात आले होते.पथकाने सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या संशयितांची छायाचित्रे तयार करून त्यांच्याविषयीची माहिती मिळवली. त्यापैकी काही जण झारखंडचे असल्याचे समजल्यानंतर मागील १५ दिवस नेरुळ पोलिसांचे पथक त्याठिकाणी सापळा रचून होते. अखेर जामनगर येथून तिघांना ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर हा गुन्हा उघड झाला. यानुसार त्यांना अटक करण्यात आली असून, अशोक शर्मा (२९), सईद हुसेन नुर शेख (२२) व फिरोज इब्राहिम शेख (१९) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे इतर पाच साथीदार व चोरीचा माल घेणारे तिघे अशा ११ जणांचाही शोध सुरू असल्याचे पोलीस सह आयुक्त बुरडे यांनी सांगितले. एखाद्या ज्वेलर्सच्या बाजूचे घर अथवा गाळा भाड्याने मिळवून रात्रीच्या वेळी भिंत फोडून घरफोडी करण्याची त्यांची पध्दत आहे. अशाप्रकारे नवी मुंबईत यापूर्वी देखील काही ज्वेलर्स लुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत.