शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

घारापुरी बेटावर हजारो शिवभक्तांची गर्दी

By admin | Updated: March 7, 2016 02:44 IST

मुंबईपासून ११ किमी अंतरावर असलेल्या जागतिक कीर्तीच्या घारापुरी लेण्या नेहमीच जगभरातील पर्यटकांना भुरळ घालत आल्या आहेत. काळ्या पाषाणात सहाव्या शतकातील

मधुकर ठाकूर,  उरणमुंबईपासून ११ किमी अंतरावर असलेल्या जागतिक कीर्तीच्या घारापुरी लेण्या नेहमीच जगभरातील पर्यटकांना भुरळ घालत आल्या आहेत. काळ्या पाषाणात सहाव्या शतकातील अतिप्राचीन कोरलेल्या अप्रतिम लेण्यांमुळे घारापुरी लेण्यांना वर्ल्ड हेरिटेजचा वारसा लाभला आहे. महाशिवरात्रीला याठिकाणी मोठी जत्रा भरते. हजारो शिवभक्त याठिकाणी दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रात वेरुळ, अंबेजोगाई, जोगेश्वरी आदी ठिकाणी शैव लेण्या आहेत. मात्र इतर ठिकाणच्या असलेल्या शैव लेण्यांपेक्षा घारापुरीच्या लेण्या आगळ्यावेगळ्या एकमेवाद्वितीय अशाच आहेत. गाभाऱ्याच्या मंडपात प्रचंड आकारातील शिवलिंग आहे. या गाभाऱ्याला चारही दिशेने प्रवेशद्वारे आहेत. लेण्यातील गाभाऱ्यात एकाचवेळी सकल आणि निष्कल अशा दोन्ही प्रकारातील शिवाचे अस्तित्व असलेल्या लेण्या फक्त घारापुरीतच आढळतात.उत्तरेकडे प्रवेश करताच प्रदक्षिणा मार्गाने जाताना पहिल्यांदाच आढळते ती योगेश्वर शिवाची (लवलीश) मूर्ती. या शिल्प पटातील लहान - मोठ्या प्रतिमांच्या केंद्रस्थानी शिवशंकर पद्मासनात बसलेले आहेत. मस्तकाच्या मागे प्रभावलय आहे. आजूबाजूला हंसारूढ ब्रम्हा, गरुडारूढ विष्णू, अश्वारूढ सूर्य, गजारूढ इंद्र, अ मृतकुंभधारी चंद्र आहेत. त्याच्या बाजूलाच रावणानुग्रहमूर्तीचे (कैलासोतोलन) शिल्प आहे. तिसऱ्या शिल्पात शिवपार्वती सारिपाट खेळतानाचा प्रसंग साकारण्यात आला आहे. मंडपाच्या दक्षिणेकडील भिंतीत तीन शिल्पे कोरलेली आहेत. त्यापैकी पहिल्यात अर्धनारीश्वर शिवाची सव्वा पाच मीटर उंचीची अतिभव्य अशी मूर्ती कोरलेली आहे. अर्धनारीश्वर म्हणजे अर्धा भाग पुरुषाचा व अर्धा भाग प्रकृतीचा अशी मूर्ती होय. या शिल्पात उजवे अंग शिवाचे तर डावे अंग पार्वतीचे आहे. सृष्टीच्या निर्मितीला पुरुष आणि प्रकृती कारणीभूत असते. म्हणजेच शिवशक्त्यैक्य कारणीभूत असते असेच या प्रचंड शिल्पातून संदेश देण्यात आला आहे.