शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यातील कळंभे केंद्रावर हजारो क्विंटल धान्याचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 01:41 IST

धान्यखरेदीमध्ये अनियमितता : खुलासा करण्याची नोटीस बजावल्याने धाबे दणाणले

वसंत भोईरलोकमत न्यूज नेटवर्क वाडा : आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यात अनेक ठिकाणी धान्य खरेदी केंद्रे असून येथे आधारभूत किमतीत भात, नागली, वरईची खरेदी केली जाते. कळंभे केंद्रावर महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक व उपप्रादेशिक व्यवस्थापक यांनी अलीकडेच भेट दिली असता त्यांना खरेदीपेक्षा हजारो क्विंटल धान्याचा जास्त साठा आढळून आला असल्याने येथे खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित केंद्रचालकांना अनियमिततेबाबत व्यवस्थापकांनी खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिसीमुळे केंद्रचालकांचे धाबे दणाणले आहे.

आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासी सेवा सहकारी सोसायट्यांच्या धान्य खरेदी केंद्रात भात, नागली, वरईची खरेदी केली जाते. तालुक्यात पोशेरी, खानिवली, परळी, कळंभे, गारगाव व खैरे-आंबिवली अशा सहा ठिकाणी खरेदी केंद्रे आहेत. आदिवासी विकास मंडळ जव्हार कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक व उपप्रादेशिक व्यवस्थापक आर. बी. पवार यांनी ७ जानेवारीला कळंभे केंद्राला भेट दिली असता त्यांना धान्याचा जास्त साठा असल्याचे निदर्शनास आले. ६ जानेवारीच्या खरेदी अहवालात ३ हजार ५७२ क्विंटल धान खरेदी झाल्याचे दाखविले; परंतु प्रत्यक्षात १० ते १२ हजार क्विंटल जास्त धान्यसाठा असल्याचे व्यवस्थापकांच्या निदर्शनास आले.दरम्यान, खरेदी केंद्राला तत्काळ नोटीस बजावून एका दिवसात खुलासा देण्याचे आदेश केंद्रचालकांना देण्यात आले आहेत. मुदतीत खुलासा न दिल्यास संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये, अशीही विचारणा नोटिसीमध्ये करण्यात आली आहे. या संदर्भात कळंभे केंद्राचे सचिव नरेश देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी बंद आहे.

धान्याचा साठा जास्त आढळल्याने कळंभे केंद्राच्या संस्थाचालकांना नोटीस बजावली आहे. दोन दिवस सुटी असल्याने त्यांचा खुलासा आलेला नाही. उद्या खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही करू.- आर. बी. पवार, उपप्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ, मोखाडा विभाग

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई