शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल फेस्टिव्हलला तीस हजार रसिकांनी दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:46 IST

कळंबोली : रोटरी क्लब आॅफ पनवेल आयोजित पनवेल फेस्टिव्हलमध्ये रविवारी सायंकाळी सी.एक्स एंटरटेनमेंट आणि जॅप्स स्क्रू आयोजित हॅन्डओव्हर फॅशन शोचे शानदार प्रदर्शन झाले.

कळंबोली : रोटरी क्लब आॅफ पनवेल आयोजित पनवेल फेस्टिव्हलमध्ये रविवारी सायंकाळी सी.एक्स एंटरटेनमेंट आणि जॅप्स स्क्रू आयोजित हॅन्डओव्हर फॅशन शोचे शानदार प्रदर्शन झाले. या वेळी डोंबिवली फास्ट चित्रपटातील अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती. खांदेश्वर रेल्वे स्थानक रोडलगत साडेसहा एक्करवर सर्कस मैदानात दहा दिवस हा फेस्टिव्हल रंगत आहे. या फेस्टिव्हलमध्ये अडीचशे स्टॉल आहेत. लहान मुलांकरिता खेळण्याबरोबरच हायस्पीड ट्रेनचा शोचे प्रदर्शन दाखविण्यात येत आहे. लोकमत या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहे.नवी मुंबई, पनवेल, उरण, रायगड येथील तीन दिवसांत तीस हजार लोकांनी पनवेल फेस्टिव्हला भेट दिली आहे. दररोजच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे मनोरंजन होते. आपल्या लाडक्या स्टारसोबत भेटही अनुभवायला मिळते. रविवारी सी.एक्स. एंटरटेनमेंट आणि जॅप्स स्क्रू आयोजित हॅन्डओव्हर फॅशन शोमध्ये चाळीस मॉडेल्स सहभागी झाले होते. रॅम्प वॉकसोबतच दीपक अ‍ॅकॅडमी पनवेल, क्रिएटिव्ह मुव या ग्रुपने हिंदी गाण्यावर नृत्य सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळवली. या वेळी मराठी अभिनेता संदीप कुलकर्णी, लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, रोटरी क्लबचे चेअरमन संतोष अंबावने, सचिव निखिल मनोहर, रोटरीयन डॉ. दीपक पुरोहित, मिलिंद पर्वते, सूर्यकांत कुल्हे, रमेश भोळे यांच्यासह रोटरीयन्स, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन तासांच्या कार्यक्रमाचे आयोजन सी.एक्स. एंटरटेनमेंटचे रामपाल यादव व जॅप्स स्क्रूचे वैभव कांबळे, गौरव सिंग, विवेक कदम, किरण कातोरे यांनी केले. फेस्टिव्हलचे संयोजन टटल्स एंटरटेनमेंट अ‍ॅण्ड मीडियाचे उदय पानसरे, कल्याणी पाठारे यांनी केले आहे. तर फेस्टिव्हलमध्ये रोटरी क्लबने स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिले आहे. औरंगाबाद, इंदोर, बंगलोर, दूरवरची मंडळीही आपल्या कलाकुसरच्या वस्तू, सजावटीच्या वस्तू, कपडे घेऊन आले आहेत.>आगरी जेवणाचे आकर्षणपनवेल फेस्टिव्हलमध्ये खाऊ गल्ली ही खवय्यांसाठी खास मेजवानी ठरत आहे. खाद्य पदार्थाचे दीडशे स्टॉल लावण्यात आले आहेत. आगरी जेवणासोबतच कोल्हापुरी, मालवणी तडका, अस्सल मराठमोळी जेवण, चायनिज पदार्थ, भेळ, पाणीपुरी असे पन्नास वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. पण आगरी जेवण फ़ेस्टिव्हलमध्ये येणाºया लोकांच्या पसंतीस ठरत असल्याचे वेसावा कोळी सी फूड या स्टॉलधारकाने सांगितले.