शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोली, घणसोली परिसरात तुंबलेल्या गटारांमुळे स्वच्छता अभियानाचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 00:59 IST

पालिकेचे दुर्लक्ष; विद्युत केबल असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई – ऐरोली आणि घणसोली विभागांत गटारांची पार दुरवस्था झाल्याचे चित्र सध्या दिसते आहे. स्वच्छता अधिका-यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना नाकतोंड दाबून घाणीच्या साम्राज्यातून जावे लागत आहे. त्यामुळे स्वच्छता विभागाचे तीनतेरा वाजले आहेत.तसेच उघड्या गटारांतूनच विद्युतकेबल गेल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घणसोली विभाग कार्यक्षेत्रात गोठिवली, तळवली, रबाले मशेश्वरनगर, घणसोली गावठाणातील म्हात्रेआळी, चिंचआळी, कौलआळी, समर्थनगर, गावदेवीवाडी, अर्जुनवाडी तसेच आदिशक्तीनगर, तर ऐरोली कोळीवाडा, दिवा कोळीवाडा, अशा अनेक ठिकाणी उघडी गटारे असल्यामुळे या गटारातील दूषित सांडपाणी पावसाळ्यात अनेकदा नागरिकांच्या घरात शिरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसरा क्रमांक पटकावलेल्या या महापालिकेच्या संबंधित अधिका-यांनी प्रत्यक्षात या नगराची पाहणी केल्यास स्वच्छता विभागाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असे येथील नागरिकांनी सांगितले.ऐरोली आणि घणसोली परिसरातील उघड्या गटारांवर नवीन झाकणे बसविण्यात येतील. तसेच गटारातून विद्युतकेबल गेल्याचे निदर्शनास आल्यास यासंदर्भात महावितरणच्या संबंधित अधिका-यांना सूचित करण्यात येईल.    - अमरीश पटनिगीरे, उपायुक्त, परिमंडळ-२, महापालिका