शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या आघाडीचा सूर

By admin | Updated: August 3, 2015 03:24 IST

डाव्या विचारांनी एकत्र येऊन जनतेला तिसरा पर्याय देणे गरजेचे आहे. या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस

अलिबाग : डाव्या विचारांनी एकत्र येऊन जनतेला तिसरा पर्याय देणे गरजेचे आहे. या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी करावे. डाव्या विचारांची ताकद त्यांच्या मागे उभी राहील, असा विश्वास शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. अलिबाग समुद्र किनारी शेकापचा ६८वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते.अलिबाग शेतकरी भवन येथून शेकापच्या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली समुद्र किनारी आल्यावर तिचे सभेत रूपांतर झाले. ‘शेतकरी, कष्टकरी कामगारांचे नेतृत्व सीताराम येचुरी यांच्या रूपाने उदयास आले आहे. जनहिताचे कार्यक्रम आता त्यांच्या नेतृत्वाखाली आखले जातील,’ असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यात सहकार क्षेत्राच्या निवडणुकीत शेकापची ९० टक्के सत्ता आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत झोकून देऊन काम करा, असे आवाहन आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. देशात तिसरी आघाडी निर्माण व्हावी आणि त्याचे नेतृत्व सीताराम येचुरी यांनी करावे, त्याचप्रमाणे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा मृत्यू दिवस हा विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात यावा, या दोन मागण्या डाव्या विचारांच्या नेत्यांनी पूर्ण कराव्यात, अशी मागणी माजी आमदार विवेक पाटील यांनी केली.बाळगंगा आणि हेटवणे धरणाचे पाणी सरकार व्यापारीकरणासाठी देत असेल, तर हा लढा डाव्या राजकीय पक्षांनी एकत्र लढला पाहिजे, असे आवाहन आमदार धैर्यशील पाटील यांनी केले. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन प्रदीप नाईक यांनी केले. सीताराम येचुरी यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल शेकापच्या वतीने आमदार जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी बाळाराम पाटील, आमदार पंडित पाटील यांच्यासह अन्य मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)