शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू साठ्याप्रकरणी तिसरा साथीदार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 05:18 IST

सव्वा कोटीच्या अवैध दारूसाठ्याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे.

नवी मुंबई : सव्वा कोटीच्या अवैध दारूसाठ्याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. ज्या बंद कंपनीत ही दारू साठवण्यात आली होती, त्या कंपनी मालकाच्या नकळत हा प्रकार सुरू होता.तुर्भे एमआयडीसीतील बंद कंपनीतील अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणी मुकेशकुमार यादव (४०) व सोनू श्रीवास्तव (३०) यांना अटक झाली होती. घटनास्थळी पोलिसांना राज्यात विक्रीसाठी परवानगी नसलेल्या मात्र सर्वाधिक मागणी असलेल्या दारूच्या ५५ हजार ५८४ बाटल्या जप्त केल्या होत्या. त्यांच्या चौकशीत इतर दोघांची नावे निष्पन्न झाली असून, त्यापैकी गणपत सोलंकी (४०) याला अटक करण्यात आली आहे. तर चौथा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे. त्याने हा या बंद कंपनीत माल उतरवला. या कंपनीची जागा ग्रुप आॅफ गुप्ता कंपनीच्या सहा भावांच्या मालकीची आहे. त्यापैकी पाच भाऊ हयात नसून उर्वरित एकमेव मालक ८५ वर्षांचे आहेत. त्यांनी सदर जागा विकण्यासाठी एका कंपनीकडे अधिकार दिले आहेत. त्या सर्वांच्या नकळत त्या ठिकाणी ही दारू साठवण्यात आली होती.