शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अजूनही नोटबंदीचे सावट

By admin | Updated: November 16, 2016 04:52 IST

आठवडा उलटूनही शहरातील बँकांबाहेरील रांगच रांग पाहायला मिळत आहे. जुन्या नोटा बदल्यासाठी तसेच खात्यात पैसे जमा

नवी मुंबई : आठवडा उलटूनही शहरातील बँकांबाहेरील रांगच रांग पाहायला मिळत आहे. जुन्या नोटा बदल्यासाठी तसेच खात्यात पैसे जमा करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहे. सुटीचा वार देखील नागरिकांनी रांगेत उभे राहूनच काढला. वाढत्या रांगांवर नियंत्रण म्हणून बँकेच्या सुरक्षा रक्षकांमध्येही वाढ करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण आणत बँकेच्या आत गर्दी होणार नाही याची दक्षता घेत आहे. मोजक्याच ग्राहकांना आत सोडले जात असून अनावश्यक गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल बस वाहतूकदारांना नोटबंदीचा मोठा फटका बसत आहे. एका बस मालकाकडे किमान तीन-चार बसेस असून या बसचा इंधन खर्च, इतर दुरुस्ती, साफसफाईसाठी दिवसाला १० हजारांहून अधिक रक्कम खर्च होत असल्याने एवढा पैसा आणायचा तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित केला आहे. (वार्ताहर)एटीएम केंद्रातही गर्दीजी एटीएम केंद्रे सुरू आहेत त्या एटीएम केंद्रातून पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी ठिकठिकाणी रांग लावल्याचे दिसून येते. नवीन नोटांच्या टंचाईमुळे काही बँकांच्या एटीएम केंद्रांचे शटर अजूनही बंदच ठेवण्यात आले आहे. बँकेतील रांग टाळण्यासाठी एटीएमचा वापर करू इच्छिणारे ग्राहक एटीएम केंद्राबाहेर रांगांनी त्रस्त झाले आहेत.

वीज महावितरणचा ग्राहकांना दिलासा-वीजबिल भरण्यासाठी महावितरण विभागाकडून गुरुवारी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. घरगुती आणि वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जेवढे वीजबिल, तेवढ्याच पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये याकरिता महावितरणची वीज भरणा केंद्रे सुरू राहणार असल्याची माहिती महावितरण विभागाने दिली आहे. वीजग्राहकांना त्वरित बिल भरता यावे यासाठी आवश्यक पूर्वतयारीसह राज्यातील सर्वच केंद्रांवर कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी तसेच ग्राहकांना अर्ज भरून देण्यासाठी वीजबिल भरण्यासाठी सहकार्य करतील. वीजबिल भरण्यासाठी आगाऊ स्वरूपात रक्कम स्वीकारली जाणार नसल्याचाही खुलासा महावितरण विभागाने केला आहे.